Thursday, August 15, 2019

मी सांगली मी कोल्हापुर....


मी सांगली मी‌ कोल्हापुर.....

मी सांगली मी कोल्हापुर
मी धरणांची कुजबुज
मी नद्यांचा सुर...........।।

मी सांगली मी कोल्हापुर
कुठे पुर कुठे हुर हुर......
खरंच किती भेदक असतो ना
वेदनेचा सुर....…..........।।

उशा पायथ्याला पाणी
तरी घसा कोरडा अन् कोरडीच वाणी
घराजवळंच काय
घरात आलीय माय कृष्णा
मलाच माञ माझी
भागवता येत नाही तृष्णा....।।

मी काल,‌‌ मी आज
घरं मोडल्यानं माणुस मोडतो का..?
मी उद्याही असणार आहे
फक्त नव्या घरात दिसणार आहे....।।

कोणकोण आलं मदतीला
कोण कुठल्या धर्माचा,
कोण कुठल्या जातीचा
मलाच काहीच दिसत नाही
मदतीच्या हाताला जात असत नाही....।।

#निसर्गापुढं माणसाचं काहीच चालत नाही
असं नाही काही....
फक्त चालवायचं तेंव्हा नाही चालवलं
की मग निसर्ग त्याची चाल चालतो
अन् आपलं काहीच चालु देत नाही
निसर्गावर मात करुन चालणार नाही,,,
निसर्गाची साथ घेऊन चालावं लागणार आहे...असो.

#असंच काहीतरी......
#मी सांगली मी कोल्हापुर....

No comments: