Tuesday, August 30, 2022
Tuesday, August 23, 2022
Monday, August 15, 2022
स्वातंञ्यदिन म्हणजे काय ?
वावरात हातात बैलाचा कासरा धरुन
बांधावर मोडका तोडका आसरा करुन
बांधावरच चिंतातुर बसुन असतो
बर्याचदा बाप.......
बाप स्वातंञ्याचा अर्थ शोधत राहतो
वावरातल्या मातीत
मातीतल्या भेगात
अन् जगावेगळ्या
आपल्याच जगात.........
तशी मायही,
बापाच्या खांद्याला खांदा
डोक्याला डोकं लावुन
राबत असते उन्हा तान्हात
कधी भर पावसात.....
एवढं करुनही,
आपल्याच पिकाचा भाव
ठरवण्याचं स्वातंञ्य
त्याच्या नशिबी नसतं
तवा मायच्या कपाळावरलं
अशोकचक्र हसत असतं
अन्
स्वातंञ्यदिन म्हणजे काय ?
हाच सवाल,
राहुन राहुन विचारत बसतं.....
मी निरुत्तरीत होतो
प्रश्न अनुत्तरित राहतो............
कोण उत्तर सांगणार हाय....?
स्वातंञ्यदिन म्हणजे नक्की काय ?
#असंच_काहितरी....
Saturday, August 13, 2022
Tuesday, August 9, 2022
Sunday, August 7, 2022
🇮🇳हर घर तिरंगा🇮🇳
आजही कित्येक घरी
भुकेचा भाकरीशी
रोज दंगा आहे
भुकेल्या पोटांसाठी
भाकरीच तिरंगा आहे
दर रोज आयुष्याशी
त्यांचा पंगा आहे
घराचं काय सांगता
ज्यांना घरंच नाही
त्यांच्याही मनात तिरंगा आहे
घरा घरातच नाही तर
मना मनात तिरंगा आहे....…..!!
#असंच_काहितरी