Tuesday, October 18, 2016

सांगायच राहुन जातं.....

🌹सांगायच ते राहुन जातं....🌹

तो हल्ली नुसताच बघतो तिला
जरा नाही दिसली की याला  करमत नाही
कधी वाटतं सांगावं सारं सारं
जे जे आहे मनात साठलेलं
पण पुन्हा भिती वाटते काय वाटेल
तिलाही तोच अर्थ भेटेल
की तिसरच काही वाटेल
अशा अशातच सांगायच राहुन जातं
मनातल सारं मनातच खाऊन होतं .......॥

सुरुवातीला वाटलं होतं
कदाचित असेल हे आकर्षण
पण आता माञ तिचाच विचार
तिच आठवते क्षण क्षण
सुर लावतो गळा गाण्यास याचा
मन अंतरीचे अंतरच मिटत नाही
अन् याचं गाऊन होतं....
पुन्हा सांगायच ते राहुन जातं ........॥

कधी वाटतं चल सोड सारं
ह्यात काही खरं नाही
पण मन मध्येच सांगतं,
आता तिच्याशिवाय बरं नाही
काय करावं काहीच सुचत नाही
अगदी जवळ आल्यासारखे वाटते
सांगायचे सारेच गळ्यात दाटते
पण हे गोड स्वप्नही ,
अश्रुंसोबत अलगद अचानक वाहुन जातं..
सांगायच जे ते राहुन जातं....॥


✍शशि...( तुझाच विचार करताना....)
www.shashichyamanatale.blogspot.com

Tuesday, October 11, 2016

जोडतो मी..

*💥🌹जोडतो मी ......🌹💥*

*माणसांना माणसाशी जोडतो मी*
*दुभंगल्या मनांना मनाशी जोडतो मी ॥*

चुक झाली भुल झाली
तु काय ती मुद्दाम केली
विसरतो जे विसराया पाहिजे
नको जे ध्यानात नसायला पाहिजे
व्यथा माझ्या कथा तुझ्या
सारेच मागे सोडतो मी
*माणसांना माणसाशी.....*
*......................जोडतो मी ॥*

कोण इथे कधी बघ कसा वागतो
जो तो स्वार्थासाठीच पाठी लागतो
जिथे ना मिळणार काही, तिथे कोण काय मागतो
देणाराही आता कोण इथे, वचनाला जागतो
या अशा वागण्यास यांच्या
हल्ली रोजच खोडतो मी
*माणसांना माणसाशी .....*
*......................जोडतो मी ॥*

तु मला आवडते , तुच माझी राणी
वयातल्या पोराची हल्ली,हिच असते वाणी
जागोजागी मग येतात,ऐकु प्रेमाची गाणी
हे यांचे प्रेम की असते नुसतेच आकर्षण
यांनाच नाही कळतं, मग चुका घडतात क्षण-क्षण
पडणारे पाऊल असे दिसताच मजला
मार्ग तयांचे मोडतो मी
*माणसांना माणसांशी......*
*......................जोडतो मी ॥*

*✍शशि...( जोडारी- माणसांचा , माणसांच्या मनाचा )*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

रावण दहन

१) रावण दहन

दरवर्षी रावण दहन
तुम्ही आम्ही पाहत आहोत ।
दरवर्षी गोडवे रामाचे
तुम्ही आम्ही गात आहोत ॥

कागदाचे रावण आम्ही 
दरवर्षी जाळत असतो ।
एक रावण मनात माञ
कायमच पाळत असतो ॥

धर्माची अधर्मावर जीत म्हणत
आपण नाचत असतो ।
घरातल्या सीतेला इथला राम
माञ रोजच जाचत असतो ॥

रावणाला शिव्या देत
आम्ही जगत असतो ।
पण खरच का रामासारखे
आपणही वागत असतो ..? 

जळणारा रावणही आपल्याला
हसत हसत पाहत आहे ।
त्याचा अंश त्याला
 आपल्यात दिसत आहे ॥

तेंव्हा, समजलच तर सारे
मनामनातला रावण जाळु या ।
मग आनंदाचे तोरण भारी
दारादारावर माळु या ॥

✍शशिकांत मा. बाबर
www.shashichyamanatale.blogspot.com