१) रावण दहन
दरवर्षी रावण दहन
तुम्ही आम्ही पाहत आहोत ।
दरवर्षी गोडवे रामाचे
तुम्ही आम्ही गात आहोत ॥
कागदाचे रावण आम्ही
दरवर्षी जाळत असतो ।
एक रावण मनात माञ
कायमच पाळत असतो ॥
धर्माची अधर्मावर जीत म्हणत
आपण नाचत असतो ।
घरातल्या सीतेला इथला राम
माञ रोजच जाचत असतो ॥
रावणाला शिव्या देत
आम्ही जगत असतो ।
पण खरच का रामासारखे
आपणही वागत असतो ..?
जळणारा रावणही आपल्याला
हसत हसत पाहत आहे ।
त्याचा अंश त्याला
आपल्यात दिसत आहे ॥
तेंव्हा, समजलच तर सारे
मनामनातला रावण जाळु या ।
मग आनंदाचे तोरण भारी
दारादारावर माळु या ॥
✍शशिकांत मा. बाबर
www.shashichyamanatale.blogspot.com
No comments:
Post a Comment