Friday, October 21, 2022

प्रिय प्रबोधिनी #CPTP8

 

मुख्य प्रवेशद्वार


प्रिय प्रबोधिनी,

ध्यानीमनी नसताना नशिबी आलेली गोष्ट मनी बसावी, असंच काहिसं झालय तुझ्याबद्दल. तुझ्याकडे येण्याआधी तुझ्याबद्दल कधी जास्त ऐकलंही नव्हतं, तुझा फोटो गुगलवर शोधण्यापासुन तुच आम्हाला आमचा फोटो भेट म्हणुन देण्यापर्यंत तुझा हा सहवास खास होता. इथं आल्यावर सर्व परिसर पाहुनंच काहिसं पहिल्याच भेटीत प्रेमात पडावं असं काहिसं झालं, राहण्याची अन् पाहण्याची उत्कृष्ट सोय ठेवलीस, फक्त खाण्याची सोय जरा अजुन चांगली हवी होती असं काही वेळेस वाटायचं. नाश्ता हाच जेवणासारखा करावा, इतका सुंदर असायचा. उद्घाटनाला माननीय विभागीय आयुक्त साहेबांनी सांगितलं, 

"बुरा ना मान जो वाईज बुरा कहें

  ऐसा भी कोई है जिसे कोई बुरा न कहें..."

ह्या शब्दांनी आपल्या रितेपणाविषयी खंत न बाळगण्याची अन् आपलं जगणं आपल्या मर्जीनुसार, आपल्याला योग्य वाटेल तसं जगण्याची गरजच अधोरेखित केली. संस्थेचे मा. संचालक सर, निसर्ग कॅमेर्यात कैद करणारा माणुस. चिञ टिपण्यासाठी जी शांतता हवी असते, तिच त्यांच्या चेहर्यावरुन दिसते. सरांनी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की, मला बोलता येत नाही, पण करता येतं...अन् पंधरा दिवसाच्या ह्या प्रशिक्षणात त्याची प्रचिती आलीच. कोर्स समन्वयक श्री. पंकज शिरभाते सरांबद्दल तर काय बोलावं, सरांचं नियोजन पाहुन खरं तर व्यवस्थापन/नियोजन यांच्या पुस्तकी व्याख्येच्यापलिकडले सारे आम्हाला त्यांच्याकडे पाहुनंच शिकायला मिळाले.विशेषतः चिखलदरा अभ्यास दौरा अन् त्यात सरांचे नियोजन अगदी वेळेवर सर्व पार पाडणं, कुठेही अतिघाई न करता, अगदी प्रेमळपणे, पुर्ण मोकळीक देऊन ज्या कारणासाठी दौरा आयोजित‌ केला तो सफल झाला पाहिजे ह्याच हेतुने सरांनी सोबत‌ केली. मध्येच कुणाला काही झाले तर लगेच मेडिकलची सोय, विचारपुस अन् यासोबतंच मला वैयक्तिक दिसलेली गोष्ट म्हणजे चहा तथा जेवण दोन्ही ठिकाणी सर्वांना पहिली संधी अन् शेवटी आपण, ह्यातुन खर्या नेतृत्वाचाही धडा न शिकवता आम्ही शिकलो आहोत.ध्यानीमनी नसताना वाट्याला आलेली प्रबोधिनी जाताना मनी बसली होती.....अतिशय प्रेमाने, आपुलकीने अन् कामाच्या गोष्टी देऊन निरोप दिलात...अन् हाती एक रोप सुद्धा, ज्याचा वटवृक्ष करण्याची जबाबदारी आता आमची असेल.….आपल्या ह्या प्रेमळ सहवासासाठी कायम आपल्या ऋणात राहु..!!!


#अविस्मरणीय आठवणींसह परत पाठवणी....

#CPTP8

#प्रबोधिनी, अमरावती

No comments: