युट्युबवरुन ज्याचा परिचय झाला असा गझलकार..जो युट्युबवरुनच थेट ह्रदयाच्या ट्युब पर्यंत पोहचलेला...नंतर योगायोगाने प्रत्यक्ष भेट झालेला...अन् पहिल्या भेटीनंतर लगेच आपलासा झालेला...त्याच्या गझले इतकाच त्याचा स्वभावही दर्जेदार आहे याची जाणिव झाली अन् ओळख मैञीत परिवर्तित झाली....तो भेटला अन् बुलढाण्यात गझलेचा ढाण्या वाघ भेटला असंच वाटलं....गझल, कविता यासोबतच त्याच्यामुळे बुलढाणा रमणीय वाटला...त्याच्या गझलेने काळजात घर केले होतेच...त्याच्या भेटीने बुलढाणा देखील घरच्यासारखेच झाले....त्याच्या भेटीमुळे पुढे दिग्गज साहित्यकार, कलाकार यांच्याशी परिचय व्हायला सुरवात झाली...मिञ वनव्यात गारव्यासारखा सांगणारे अनंत राऊत यांना फक्त प्रत्यक्ष ऐकणेच नाही तर त्यांच्या सोबत फिरता आले...कुठे फिरायला जाणे असो, नाहितर कुणाला भेटायला जाणे असो....सर्वच ठिकाणी कायम सारथ्य करायला तयार असणारा कृष्ण....'एक राणी गेल्याने डाव संपत नाही', असं म्हणत हरलेल्या मनाला उभारी देणारी त्याची गझल त्याच्या आयुष्याला शोभा आणतेच आहे...पण डावही संपु नये अन् राणीही जाऊ नये, अन् हा आमचा राजा कायम असाच सम्राट बनुन रहावा...ह्याच मनःपुर्वक शुभेच्छा...अशा ह्या मिञ, तत्वज्ञ अन् वाटाड्यास अर्थात ह्या मितवास, गझलसम्राटास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा....
🎂🎂🎂🎂🎂💐💐💐💐💐
विशालच्या काही निवडक माझ्या आवडीच्या ओळी :
" लायक आहे मनगट माझे अजुन देवा
मंदिरात मी म्हणून काही मागत नाही "
----------------
" पेरला गेलाय माझा जन्म येथे
यामुळे मी वावरावर शेर लिहितो "
-----------------
"कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी
सुर्य कदाचित हसतो गाली संध्याकाळी
कंटाळा या जगण्याचाही आल्यानंतर
जीव करावा तुझ्या हवाली संध्याकाळी "
-----------------
"दोघांमधल्या दुराव्यास या
कारण ठरली केवळ भाषा
मज ओठांची जमली नाही
तुज डोळ्यांची कळली नाही"
-------------------
मंदिरात मी म्हणून काही मागत नाही "
----------------
" पेरला गेलाय माझा जन्म येथे
यामुळे मी वावरावर शेर लिहितो "
-----------------
"कशी पसरते इतकी लाली संध्याकाळी
सुर्य कदाचित हसतो गाली संध्याकाळी
कंटाळा या जगण्याचाही आल्यानंतर
जीव करावा तुझ्या हवाली संध्याकाळी "
-----------------
"दोघांमधल्या दुराव्यास या
कारण ठरली केवळ भाषा
मज ओठांची जमली नाही
तुज डोळ्यांची कळली नाही"
-------------------
#मनोहर
#असंच_काहितरी
No comments:
Post a Comment