Monday, August 29, 2016

सोसल तेवढच सॊशल

पटलं तर घ्या 📖📖📖
----------------------------------------

*सोसल तेवढंच सोशल*

खरे तर आज प्रगतीचे युग आहे . या स्पर्धेच्या, तंञज्ञानाच्या ,विज्ञानाच्या आणखी कशाच्या म्हणता येईल त्या युगात आपण जगत आहोत . सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत नव्हे बनलाच आहे . वर्तमानपञ,इंटरनेट या बरोबरच व्हाँटस अप, फेसबुक अन् व्टिटरच्या माध्यमानं त्याची व्याप्ति वाढली आहे . अबोलकी माणसंही या निमित्ताने बोलकी झाली.माणसानं नव्याचं स्वागत जरुर करावं पण जुन्याचा आदर्शही विसरता कामा नये. आज आम्ही या सोशल मिडियाचा किती वापर करतो आहोत . यामुळे आपण वेळ असुन व्यस्त झालो आहोत. पुर्वीच्या घरी रामकृष्ण अन् विरशिवाजीच्या गोष्टी सांगत असे आजी पण आता मोबाईलनच मारलीय बाजी. बाळ असते गुंग त्याच्या मोबाइल मध्ये अन् आजी बिचारी निवांत. त्या मोबाईलमध्येच तो कसल्या कसल्या गोष्टी पाहतो, ऎकतो ,मग दुसर्या गोष्टी ऐकायला त्याला वेळच कसा मिळणार अन् तसेही यमी अन् मम्मी एवढंच कळणार्या त्याला त्या आजीच्या राजाराणीच्या अन् सोनपरीच्या गोष्टी कशा कळणार. आणि गोष्टीतल्या सोनपरी ऐकायला त्याला कसे चालणार ,त्याची परी त्याला रोजचं हायबाय करत असतेच की आॅनलाईन . पूर्वी आपल्या घरची सुरवात जात्यावरच्या ओव्यांनी व्हायची आता हिच सुरवात एकाकीपणाच्या जाणिवेने अन् बारकाव्यांनी होते.पूर्वी घरची सकाळ आस्था टिव्हीने व्हायची आता हिच सकाळ एम टिव्हीने सुरु व्हायला लागली अन् साहजिकच राञ ' *तुका झालासे कळस* 'ने नाहितर ' *तुक्या तुकविला नाग्या नाचविला* 'ने होते. मी हे सर्व का सांगतोय ? सोशल मिडियाचा वापर तोही (गैर) वापर होतं असल्याने हे चिञ आहे . आज मोबाइल ही चैनीची वस्तु न राहता गरज बनली आहे. एवढच नाहितर या गोष्टींचं व्यसनं बनत चाललय. तंञज्ञानाने जगाला जवळ आणले हे जरी खरे असले तरी या सोशल मिडियाच्या अतिवापराने दुर दुर गेलीत माणसे. एकाच घरात राहणार्यांही परस्परात बोलायला वेळ नाहियं. सारं काहि अगदी तळहातावर हवं, अशी आपली मानसिकता झालीय. सार्याच गोष्टी जरा गुगल करुन बघु, म्हणत पाहिजे असतात आपल्याला . *परस्परांची नाती जपण्यापेक्षा या सोशल मिडियाच्या तेलानं ती वातीसारखी जळु लागलीत*. शेवटी एवढंच *या सोशल मिडियाचा सोसल तेवढाच वापर व्हावा*  कारण *आईचे प्रेम अन् पावसाचा थेंब अजुन तरी नेटवर मिळत नाहीच*.

✍शशिकांत मा. बाबर
( शिवव्याख्याते,बोररांजणी, जि. जालना )

विविध विषयावरील बहुरंगी लेख,कविता वाचण्यासाठी संपर्क 👇👇👇
मो.९१३०६२०८३४(what'sapp)
shashikantbabar12@gmail.com

No comments: