सह्याद्रीच्या खडकांसारखा अभेद्य बाणा असणारा ... शिवछञपती सारख्या वाघाचा छावा ...... बालपणीच मातेचे छञ हरवल्यावर जिजाऊमाँसाहेबांच्या विद्यापीठात तयार झालेला छञपती... शस्ञांसोबत शास्ञांतही पारंगत असणारा.... छळ, कपट अन् अंतर्गत कलहांना स्वाभिमानाने सामोरे जाणारा...मिञासाठी जीव देणारा पण दगाबाजांना तितक्याच कठोरपणे यमसदनी पाठवणारा.... न्याय्यबुद्धीने राज्य करणारा....आपल्या अल्प काळातही काळाच्या भाळावर आपल्या कर्तृत्वाची सोनेरी मुद्रा उमटवणारा....बाप से बेटा सवाई म्हणतात तसे शिवरायांच्या स्वराज्याची उंची अधिक वाढवणारा, तरिही कल्पोकल्पित घटनांच्या आधारे काहींनी 'बढे बाप की बिगडी हुई औलाद' असा ठपका ज्यांच्यावर ठेवला असा, पण या अशा अफवांना भिक न घालता शिवरायांनी निर्मिलेल्या स्वराज्याचा आपल्या कर्तृत्वाने खरा वारसदार ठरलेला.... मरणाला स्वतःची लाज वाटावी इतक्या निडरपणे मृत्युला सामोरे जाणारा .... स्वराज्याचा धाकला धनी म्हणजे छञपती शंभूराय.....राजे आपल्या जयंतीनिमित्त आपल्या पविञ स्मृतिस विनम्र अभिवादन....🙏
No comments:
Post a Comment