वर्षपुर्ती स्वप्नपुर्तीची...! #नायब_तहसिलदार
एका वर्षापुर्वी आजच्याच दिवशी म्हणजे 31 मे 2022 रोजी राज्यसेवा 2020 चा अंतिम निकाल लागला होता..कोरोनाच्या दोन वर्षांच्या अंधारानंतर हा निकालाचा काजवा मिणमिणत हाती आला होता...आयुष्यातल्या पहिल्या गोष्टींचा आनंद काही वेगळाच असतो...पहिल्यांदा बोलणं शिकलो तेंव्हाचे बोबडे बोल अन् त्या आठवणी कायम आनंददायी असतात..पुढे मोठमोठी भाषणं करायला शिकतो, पण ते बोबडे बोल माञ अनमोलच...कारण ते पहिले पहिले शब्द असतात..जसं पहिलं प्रेम अन् प्रेमातली पहिली भेट....तशीच पहिली नोकरीही ! तसंही एका बेरोजगार मुलासाठी नोकरी म्हणजे 'ती'च... कधीकधी तिच्यापेक्षाही जास्त महत्वाची, म्हणुनच तर तिच्यापासुन दूर होऊनही 'हि'ला मिळवण्यासाठी धडपडणारी तरुणाई आपल्याला दिसते...पहिल्यांदा मिळणाऱ्या गोष्टींचा आनंद काही औरच असतो...या निकालानंतर मागच्या एका वर्षात दोन निकाल लागले...बेरोजगार ते वर्ग ब अधिकारी अन् पुढे वर्ग अ अधिकारी असा प्रवास करता आला...पण पहिल्यांदा कुठली नोकरी लागली...त्यातही सरकारी अधिकारी झालो...गावाकडच्या भाषेत लोकांसाठी साहेब झालो, ह्या सगळ्या गोष्टी अविस्मरणीय...त्यामुळे 31 मे हा तसा अविस्मरणीयच...प्रवास इथे संपला नाहीच...फक्त मुक्कामाची ठिकाणी अशी वेळेवर भेटत गेली की पावलांना चालायला अजुन बळ मिळतं एवढं नक्की...सरल्या सालाचे आभार 🙏 आता ह्या नव्या सालात पावलांना पुढच्या प्रवासासाठी अधिक बळ मिळो, हिच प्रार्थना !!
#असंच_काहितरी
🖋शशिच्या मनातले
No comments:
Post a Comment