Thursday, August 15, 2019
मी सांगली मी कोल्हापुर....
मी सांगली मी कोल्हापुर.....
मी सांगली मी कोल्हापुर
मी धरणांची कुजबुज
मी नद्यांचा सुर...........।।
मी सांगली मी कोल्हापुर
कुठे पुर कुठे हुर हुर......
खरंच किती भेदक असतो ना
वेदनेचा सुर....…..........।।
उशा पायथ्याला पाणी
तरी घसा कोरडा अन् कोरडीच वाणी
घराजवळंच काय
घरात आलीय माय कृष्णा
मलाच माञ माझी
भागवता येत नाही तृष्णा....।।
मी काल, मी आज
घरं मोडल्यानं माणुस मोडतो का..?
मी उद्याही असणार आहे
फक्त नव्या घरात दिसणार आहे....।।
कोणकोण आलं मदतीला
कोण कुठल्या धर्माचा,
कोण कुठल्या जातीचा
मलाच काहीच दिसत नाही
मदतीच्या हाताला जात असत नाही....।।
#निसर्गापुढं माणसाचं काहीच चालत नाही
असं नाही काही....
फक्त चालवायचं तेंव्हा नाही चालवलं
की मग निसर्ग त्याची चाल चालतो
अन् आपलं काहीच चालु देत नाही
निसर्गावर मात करुन चालणार नाही,,,
निसर्गाची साथ घेऊन चालावं लागणार आहे...असो.
#असंच काहीतरी......
#मी सांगली मी कोल्हापुर....
Thursday, May 16, 2019
Thursday, April 25, 2019
असंच काहितरी.... #निरोप समारंभ....#क्षितिज 2k19
Foundation अन् Geotech शिकवणारे बाबा
काय शिकवतात तोबा तोबा....
नजरेमधुनच नुसत्या
सार्या वर्गावर ठेवत असतात ताबा........
एक मास्तर अजुन बाबासारखाच बाप आहे
लेकरांना वाटते उगाच डोक्याला ताप आहे......
कधी कधी वाटते, हेही त्यांचेच चले आहेत
ते काही असो, माणुस तसे भले आहेत....
Water resource शिकवणार्या बाई
प्रेम अन् मायेचाही Source आहेत......
कुठले विद्यापीठ अन् कुठले महाविद्यालय
सांगा कुठे अशा बाई अन् असा Course आहे......
एक आमुचे सर, त्यांची कुणालाच नाही सर
त्यांच्यामुळेच वाटते आम्हाला College जणु घर...
ना कुठलाच आडकाठी, ना कुठला अडथळा
रस्त्यावर सुद्धा सहज करता येते विचारपुस.....
कुणाबद्दल बोलतोय काय विचारता..?
अहो, असा एकंच आहे आपल्याकडे देवमाणुस....
त्यांनीच आम्हाला
Concrete, Steel सारं सारं शिकवलं.....
माणसानं माणसाशी माणसासारखं राहायचं,
मनावर आमच्या गिरवलं.....
आपल्या सगळ्यांकडुन जे शिकलो, जे घेतलं ते आयुष्यभर पुरेल इतकं आहे..... खरंच आपल्यासारखे शिक्षक भेटले हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल....
नाहीतरी,
"कोणती पुण्य अशी
येती फळाला...
जोंधळ्याला चांदणे
लखडुन जावे...."
आपल्यासर्वांच्या कायम ऋणात राहायलाच मला आवडेल...
तरी आपल्या सर्वांचे काळजाच्या कातळापासुन आभार.......
काय शिकवतात तोबा तोबा....
नजरेमधुनच नुसत्या
सार्या वर्गावर ठेवत असतात ताबा........
एक मास्तर अजुन बाबासारखाच बाप आहे
लेकरांना वाटते उगाच डोक्याला ताप आहे......
कधी कधी वाटते, हेही त्यांचेच चले आहेत
ते काही असो, माणुस तसे भले आहेत....
Water resource शिकवणार्या बाई
प्रेम अन् मायेचाही Source आहेत......
कुठले विद्यापीठ अन् कुठले महाविद्यालय
सांगा कुठे अशा बाई अन् असा Course आहे......
एक आमुचे सर, त्यांची कुणालाच नाही सर
त्यांच्यामुळेच वाटते आम्हाला College जणु घर...
ना कुठलाच आडकाठी, ना कुठला अडथळा
रस्त्यावर सुद्धा सहज करता येते विचारपुस.....
कुणाबद्दल बोलतोय काय विचारता..?
अहो, असा एकंच आहे आपल्याकडे देवमाणुस....
त्यांनीच आम्हाला
Concrete, Steel सारं सारं शिकवलं.....
माणसानं माणसाशी माणसासारखं राहायचं,
मनावर आमच्या गिरवलं.....
आपल्या सगळ्यांकडुन जे शिकलो, जे घेतलं ते आयुष्यभर पुरेल इतकं आहे..... खरंच आपल्यासारखे शिक्षक भेटले हे आमचं भाग्यच म्हणावं लागेल....
नाहीतरी,
"कोणती पुण्य अशी
येती फळाला...
जोंधळ्याला चांदणे
लखडुन जावे...."
आपल्यासर्वांच्या कायम ऋणात राहायलाच मला आवडेल...
तरी आपल्या सर्वांचे काळजाच्या कातळापासुन आभार.......
Saturday, March 23, 2019
प्रिय भुषण.....
आपण जन्मलो यात आपले कसलेच मोठेपण नाही , तरी आपण एवढे मोठमोठे वाढदिवस का साजरे करतो...? हा प्रश्न बर्याचदा पडतो मला. पण वाढदिवस साजरा करणं , म्हणजे आपला जन्म झालाय अन् आपल्या जन्माची आपल्याला जाणिव व्हावी , अन् आपण का जन्मलो हे आपण सिद्ध करण्यासाठी सज्ज व्हावं , म्हणुन साजरा करत असावेत. मुळात जन्मदिवस म्हणजे काय ? हे सांगताना भारताचे भुतपुर्व राष्ट्रपति भारतरत्न डाॅ. अब्दुल कलाम म्हणतात जन्मदिवस म्हणजे असा एकमेव दिवस ज्या दिवशी तुम्ही रडत असता अन् तुमची आई हसत असते, बाकी आयुष्यात तुम्हाला ठेच जरी लागली तरी तिच्या डोळ्यात पाणी येते. बरं हे सर्व ठिक आहे , पण हे असं अचानक जन्म , जन्मदिवस या सगळ्या बद्दल का बोलतोय म्हणुन आश्चर्य वाटलं का....? नाही , ते कसं आहे ... आत्ता नुकताच एका मिञाचा वाढदिवस साजरा केला. बरं , ज्याचा वाढदिवस साजरा केला त्याच्याबद्दलंच खरं तरं लिहणार होतो , पण हे असं विषयानंतर होतंच बरं का...असो.
तर विषय आहे भुषण.... नाही भुषणाचा काही विषय आहे का..? असं कितीही म्हटलं तरी माझ्या आजच्या लिहिण्याचा विषय माञ भुषणंच आहे. बरं भुषण बद्दल सांगावं तरी काय..? तो काही फार कुणी प्रसिद्धही नाही , किंवा फार स्टार ही नाहिये..... तो आहे यश मिळवण्यासाठी सिद्ध झालेला स्टार....मला आवडणार्या काही निवडक व्यक्तींपैकी एक , ज्याच्या साध्या पण प्रॅक्टीकल राहण्याचा आपण जबरदस्त फॅन आहोत... एखादी गोष्ट करायची म्हटलं की त्यात सर्वस्व ओतुन जिव लावुन काम करण्याची तयारी असणारा मुलगा.... एखादी गोष्ट जमत नसेल तर नाही येत हे ही तितक्याच मोकळेपणाने सांगणारा अन् खाञीशीर असेल अशाच गोष्टी सांगणारा .... अभ्यास , हुशारी , शैक्षणिक प्रगती या सगळ्या गोष्टीत तर पुढे आहेच , पण याबरोबरच नाटक , विडंबन इत्यादीच्या माध्यमाने रंगमंचावर अवतरणारा कलाकार.... जे येत नाही ते शिकण्याचा ध्यास घेत प्रयत्नपुर्वक शिकणारा.... विनोद , चेष्टा सारंच अगदी मर्यादेत..... जगणं बिनधास्त असावं पण भविष्याची जरा धास्तीही असायलाच हवी नाही का..? अशा पद्धतीने अमर्याद वागण्याला मर्यादा घालणारा..... माणुस म्हणुन खुप छान वाटणारा... अन् आयुष्यात ज्याची सोबत मला कायम लाभावी असे वाटते अशा मिञांपैकी एक.... नव्हे कदाचित एकमेवही म्हणता येईल.....
भुषण , तुझी नुकतीच L&T कंपनी मार्फत पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात येणार्या मुलाखतीसाठी निवड झाली आहे... तु GATE मध्येही चांगल्या गुणांसह पास झाला आहेस... अजुन इतरही दिलेल्या बर्याच परिक्षांचे निकाल बाकी आहेत , त्यातही तु बाजी मारशील यात शंका नाही...
या सगळ्याबद्दल तुझे खुप खुप अभिनंदन अन् हे सगळं करताना तुझ्यातल्या ज्या साधेपणावर मी कायमच फिदा आहे त्या साध्या , मनमोकळेपणाचे खुप कौतुकही वाटते.....
आता पदवी शिक्षण झाल्यावर पुढच्या तिन महिन्यानंतर आपण सगळेच आपापल्या ध्येयमार्गावर मार्गस्थ होऊ पण या सगळ्यात आपली मैञी कायम राहिल......
तु खुप मोठा माणुस होशील यात शंकाच नाही , त्यासाठी तुला मनापासुन खुप खुप शुभेच्छा......
आणि हो , कधीही , कुठेही मी तुझ्या मदतीला आलो तर मला नक्कीच आनंद होईल....
सुखाच्या क्षणी नाही बोलवलं तरी चालेल... दुःखात नक्की बोलवं , मी नक्कीच उभा असेन कायम तुझ्यासाठी....
हे , बघं या सगळ्यात तुला वाढदिवसाच्या शुभेच्छाच दिल्या नाहित वाटतं ... असो.
तुला वाढदिवसाच्या आभाळभर नव्हे त्यापेक्षाही जास्त शुभेच्छा.......
खुप मोठा हो.....
तुझाच....
Saturday, January 26, 2019
ग्रेट भेट.....# सन्मान कवितेचा # अभिमान माझा
आज शासकीय विश्रामगृह(अजिंठा विश्रामगृह , जळगाव) येथे अनाथांची माय डाॅ. सिंधुताई सपकाळ यांची भेट घेण्याचे भाग्य लाभले.... माई सागर पार्क येथे पार पडत असलेल्या बहिणाबाई महोत्सवात बोलण्यासाठी आलेल्या असताना श्री संदिप महाजन सरांनी कळवल्यानंतर लगेच भेटायला निघालो. केवळ महाजन सरांमुळे माईंना भेटता आले हेही खरे. माईंना भेटल्यानंतर महाजन सरांनी ओळख करुन दिली व मी माईंवरती एक कविता केली असल्याचे त्यांना सांगितले. माईंनी लगेच म्हटले ," ऐकव की लवकर मग " अन् मी कविता ऐकवली. एका एका शब्दानंतर मिळणारी माईंची दाद मला कित्येक पुरस्कारांपेक्षाही जास्त आनंद देत होती. कविता ऐकताना काही शब्दांची पुनरावृत्ती झालीय असं वाटल्यानंतर माईंनी लगेच सांगितले , " बाळ सगळं कसं चौकटीत पाहिजे , मग ते जगणं असेल नाही तर कविता असेल. माणसानं एका चौकटीत असावं." मध्येच एका ओळीत मी ताई हा शब्द वापरलेला होता . ते ऐकल्यावर माई म्हणाल्या , " ताई नको माई म्हण , अरे आई म्हणताना सुद्धा ओठाला ओठ लागत नाहीत ,पण ओठाला ओठ भिडल्याशिवाय माई म्हणताच येत नाही. माई म्हण....." पुढे सगळी कविता ऐकल्यावर माई म्हणाल्या ," काय लिहतोस तु ! तु हाडाचा कवि आहेस. तुझी ही कविता मला पाठव . मी ही कविता माझ्या संस्थेत फ्रेम करुन लावेल. तुझा नंबर दे. आणि हो , कधीपुण्याला आलास..? नाही...? " अन् महाजन सरांना सांगितले ," याला घेऊन ये...
अवघ्या काही मिनिटांची ती भेट , पण अमुल्य असा ठेवा ठरावी असे ते क्षण होते....
माई बोलत होत्या अन् मी भारावुन जात होता. आपले शब्द आज धन्य झाले असं आतुन वाटत होते. माझ्यासाठी हा कवितेचा सर्वोच्च सन्मान आहे.....
कविते हे सारं तुझ्यामुळेच....
सारं काही तुझंच आहे.....मी फक्त निमित्त माञ...
माईंनी पुस्तकात लिहिलेल्या ओळी ,
*" शशिकांत , तु आग पितोस . शब्दात ती ओततोस आणि कवितेची धग पेटती ठेवतोस. "*
माईंचा संदेश ( जो आजन्म स्मरणात राहिल असा )
*" आयुष्याच्या झळा , झेलत रहा बाळा...."*
#अनाथांची माय .....
#वेदनेचा बाजार नव्हे बाजाराची वेदना मांडता आली पाहिजे......
मी अद्याप काय कमावले असे कुणी विचारले तर ही अन् अशा मोठ्या माणसांच्या कौतुकाच्या थापा हिच माझी कमाई आहे , एवढेच मी सांगु शकेल....... अजुन खुप काही करायचंय अन् खुप दुर जायचंय.... ध्येयापर्यंत पोहचण्यासाठी ही सारी माझी प्रेरणास्थानं आहेत......
🖋 शशिकांत शांताबाई मारोती बाबर....
(लिड इंडिया २०२०, जळगाव)
Wednesday, January 23, 2019
महानायक नेताजी
स्वातंञ्य पेनाच्या शाईने नव्हे रक्तानेच मिळेल....
तेंव्हा स्वराज्यासाठी रक्त मागणारा....
ध्येयाची एकनिष्ठ असलेला....
एक समाजवादी लढवय्या योद्धा....
स्वतःचे सरकार स्थापन करुन ब्रिटिश साम्राज्याला हादरवणारा.....
स्वातंञ्यलढ्यासाठी स्वतःची फौज तयार करणारा
अन् स्वतःच एका फौजेसमान असणारा....
मृत्युपश्चात इग्रजांची झोप उडवणारा....
ब्रिटिशांसाठी खलनायक असणारा
महानायक म्हणजे नेताजी सुभाष चंद्र बोस....
नेताजी आपल्या नावात जरी चंद्र असला तरी आपण सुर्य होतात हेच खरे......
Tuesday, January 22, 2019
मराठी साहित्य (UPSC optional) संदर्भ ग्रंथ
Section wise Reference books (Read selectively and smartly)
Paper – I
Answers must be written in Marathi.
भाषा आणि लोकसाहित्य (Language and Folk - Lore)
A) Nature and Functions of Language (With reference to Marathi)
Language as a Signifying System:
आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)
Langue and Parole:
आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)
Basic Function : साहित्य विचार – दत्तात्रेय पुंडे आणि स्नेहल तावरे (स्नेहवर्धन प्रकाशन )
Poetic language; Standard Language and dialect; Linguistic features of Marathi in 13th and 17th Century: प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स (सर्वाधिक सटीक माहिती), राहुल कर्डिले नोट्स, इंटरनेटचा वापर करावा.
Language variations according to social parameters; प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)
B) Dialects of Marathi: -
i) अहिराणी:
१) इंटरनेटवरील विविध लेख,
२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स,
३) अहिराणी मधील साहित्य - उदा. बहिणाबाईंच्या कविता (उत्तरात नेहमी वापरा) (मौलीवूड गाणे)
४) अहिराणी भाषेचा अभ्यास (कोणतेही प्रकाशन चालेल)
ii) वैदर्भी:
१) वैदर्भी भाषेचा अभ्यास (कुठल्याही प्रकाशनाचे बेसिक पुस्तक)
२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.
iii) डांगी
१) ‘डांग्ज’ – लेखक: रणधीर बीट (पद्मगंधा प्रकाशन)
२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.
C) मराठी व्याकरण (महत्वाचे: कोणतीही दोनच पुस्तके वापरा)
Parts of Speech; Case-system; Prayog-vichar (Voice)
मराठी व्याकरण – प्रकाश परब
मराठी व्याकरणाचा अभ्यास – लीला गोविलकर
मो. रा. वाळिंबे
अर्जुनवाडकर
Nature and kinds of Folk-lore (लोकसाहित्य)
(with special reference to Marathi)
लोकगीत, लोककथा, लोकनाट्य
१) विश्वनाथ शिंदे – लोकसाहित्य - भाग १ (अति महत्वाचे)
२) विश्वनाथ शिंदे – लोकसाहित्य - भाग २ (अति महत्वाचे)
३) रां. चि. ढेरे यांच्या विविध लोकसाहित्यावरील पुस्तकाचा निवडक अभ्यास
४) प्रभाकर मांडे – लोकसाहित्याचा अभ्यास (निवडक)
Section – B
मराठी साहित्याचा इतिहास
१) प्रारंभ ते १८१८ पर्यंत
अ) महानुभाव लेखक – स्थानिक बाजारपेठेतील कोणतेही पुस्तक जे तुम्हाला आवडेल.
आ) वारकरी कवी – इंटरनेट वरून प्रत्येक संताचा अभ्यास करा (उदा. तुकाराम, ज्ञान्नेश्वर, नामदेव, एकनाथ)
इ) पंडित कवी – यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके ( स्थानिक जिल्ह्यातील पुस्तक म्हणजे इतरांपेक्षा वेगळे उत्तर लिहिता येईल)
ई) शाहीर - यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके ( स्थानिक जिल्ह्यातील पुस्तक म्हणजे इतरांपेक्षा वेगळे उत्तर लिहिता येईल)
उ) बखर – हेरवाडकर यांचे पुस्तक, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके
२) १८५० ते १९९०
काव्य, नाटक, कथा, लघुकथा, कादंबरी; प्रदक्षिणा खंड १ आणि प्रदक्षिणा खंड २ (विशेष तयारी आवश्यक आहे), चर्चेतील कवी, नाटककार, कादंबरीकार, कथाकार यांचा विशेष अभ्यास करा.
Romantic, Realist, Modernist. (कमी महत्वाचा भाग) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, संदर्भ क्लासेस चे गाईड.
दलित साहित्य - यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके (निवडक), वामन निंबाळकर यांचे पुस्तक, मराठी काव्य, मराठी नाटक, मराठी कादंबरी, मराठी कथा यांचा विभागवार अभ्यास.
ग्रामीण साहित्य – ग्रामीण साहित्याचा अभ्यास. (यात रा.र.बोराडे, वासुदेव मुलाटे व इतर लेखक), यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके
फेमिनिस्ट - प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके
साहित्य समिक्षा (Literary Criticism) : रा.भा. पाटणकर, राहुल कर्डिले यांच्या नोट्स, प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.
साहित्याचे मूल्यमापन, साहित्य समाज आणि संस्कृती – याच शीर्षकाचे स्थानिकस्तरावरील दर्जेदार पुस्तक,
महत्वाचे: दर रविवारी पुण्यनगरी, सामना,महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, लोकमत या वृत्तपत्रात मराठीची माहिती येते ती गोळा करा, त्यामुळे महितेचे विशिष्टीकरण जपल्या जावून गुण उत्तम मिळतात.
Paper – I
Answers must be written in Marathi.
भाषा आणि लोकसाहित्य (Language and Folk - Lore)
A) Nature and Functions of Language (With reference to Marathi)
Language as a Signifying System:
आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)
Langue and Parole:
आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)
Basic Function : साहित्य विचार – दत्तात्रेय पुंडे आणि स्नेहल तावरे (स्नेहवर्धन प्रकाशन )
Poetic language; Standard Language and dialect; Linguistic features of Marathi in 13th and 17th Century: प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स (सर्वाधिक सटीक माहिती), राहुल कर्डिले नोट्स, इंटरनेटचा वापर करावा.
Language variations according to social parameters; प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, आधुनिक भाषाविज्ञान : सिद्धांत आणि उपयोजन - मिलिंद स. मालशे (लोकवाड्मय गृह प्रकाशन)
B) Dialects of Marathi: -
i) अहिराणी:
१) इंटरनेटवरील विविध लेख,
२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स,
३) अहिराणी मधील साहित्य - उदा. बहिणाबाईंच्या कविता (उत्तरात नेहमी वापरा) (मौलीवूड गाणे)
४) अहिराणी भाषेचा अभ्यास (कोणतेही प्रकाशन चालेल)
ii) वैदर्भी:
१) वैदर्भी भाषेचा अभ्यास (कुठल्याही प्रकाशनाचे बेसिक पुस्तक)
२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.
iii) डांगी
१) ‘डांग्ज’ – लेखक: रणधीर बीट (पद्मगंधा प्रकाशन)
२) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.
C) मराठी व्याकरण (महत्वाचे: कोणतीही दोनच पुस्तके वापरा)
Parts of Speech; Case-system; Prayog-vichar (Voice)
मराठी व्याकरण – प्रकाश परब
मराठी व्याकरणाचा अभ्यास – लीला गोविलकर
मो. रा. वाळिंबे
अर्जुनवाडकर
Nature and kinds of Folk-lore (लोकसाहित्य)
(with special reference to Marathi)
लोकगीत, लोककथा, लोकनाट्य
१) विश्वनाथ शिंदे – लोकसाहित्य - भाग १ (अति महत्वाचे)
२) विश्वनाथ शिंदे – लोकसाहित्य - भाग २ (अति महत्वाचे)
३) रां. चि. ढेरे यांच्या विविध लोकसाहित्यावरील पुस्तकाचा निवडक अभ्यास
४) प्रभाकर मांडे – लोकसाहित्याचा अभ्यास (निवडक)
Section – B
मराठी साहित्याचा इतिहास
१) प्रारंभ ते १८१८ पर्यंत
अ) महानुभाव लेखक – स्थानिक बाजारपेठेतील कोणतेही पुस्तक जे तुम्हाला आवडेल.
आ) वारकरी कवी – इंटरनेट वरून प्रत्येक संताचा अभ्यास करा (उदा. तुकाराम, ज्ञान्नेश्वर, नामदेव, एकनाथ)
इ) पंडित कवी – यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके ( स्थानिक जिल्ह्यातील पुस्तक म्हणजे इतरांपेक्षा वेगळे उत्तर लिहिता येईल)
ई) शाहीर - यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके ( स्थानिक जिल्ह्यातील पुस्तक म्हणजे इतरांपेक्षा वेगळे उत्तर लिहिता येईल)
उ) बखर – हेरवाडकर यांचे पुस्तक, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके
२) १८५० ते १९९०
काव्य, नाटक, कथा, लघुकथा, कादंबरी; प्रदक्षिणा खंड १ आणि प्रदक्षिणा खंड २ (विशेष तयारी आवश्यक आहे), चर्चेतील कवी, नाटककार, कादंबरीकार, कथाकार यांचा विशेष अभ्यास करा.
Romantic, Realist, Modernist. (कमी महत्वाचा भाग) प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, संदर्भ क्लासेस चे गाईड.
दलित साहित्य - यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके (निवडक), वामन निंबाळकर यांचे पुस्तक, मराठी काव्य, मराठी नाटक, मराठी कादंबरी, मराठी कथा यांचा विभागवार अभ्यास.
ग्रामीण साहित्य – ग्रामीण साहित्याचा अभ्यास. (यात रा.र.बोराडे, वासुदेव मुलाटे व इतर लेखक), यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके
फेमिनिस्ट - प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स, यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची पुस्तके
साहित्य समिक्षा (Literary Criticism) : रा.भा. पाटणकर, राहुल कर्डिले यांच्या नोट्स, प्रविण चव्हाण सरांच्या नोट्स.
साहित्याचे मूल्यमापन, साहित्य समाज आणि संस्कृती – याच शीर्षकाचे स्थानिकस्तरावरील दर्जेदार पुस्तक,
महत्वाचे: दर रविवारी पुण्यनगरी, सामना,महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता, लोकमत या वृत्तपत्रात मराठीची माहिती येते ती गोळा करा, त्यामुळे महितेचे विशिष्टीकरण जपल्या जावून गुण उत्तम मिळतात.
Sunday, January 13, 2019
Saturday, January 12, 2019
इतिहासातील पुस्तके व लेखक
- पुस्तके – लेखक
- होली संगम – विजयलक्ष्मी पंडीत
- द इंडियन स्ट्रगल – आचार्य कृपालानी
- इंडियन विन्स फ्रिडम – मौलाना आझाद
- पाकिस्तान और पार्टीशन ऑफ इंडिया – मौलाना आझाद
- गुबारे खातीर (पत्रसंग्रह) – मौलाना आझाद
- अ नेशन इन द मेकींग – सुरेंद्रनाथ बॅनर्जी
- आय. एम.ए. सोशलिस्ट – विवेकानंद
- व्हिलेजिअस प्रोब्लम इन इंडिया – अॅनी बेझंट
- इंडिया ए नेशन, हाऊ इंडिया फॉट फॉर इट्स फ्रिडम – अॅनी बेझंट
- द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स – अॅनी बेझंट
- इंडिया अँड दी एम्पायर – अॅनी बेझंट
- ग्लिम्पसेस ऑफ द वर्ल्ड हिस्टरी – पं. जवाहरलाल नेहरू
- हू लिव्हज, इफ इंडिया डाइज – पं. जवाहरलाल नेहरू
- अॅट द फिट ऑफ महात्मा गांधी – डॉ. राजेंद्र प्रसाद
- आनंदमठ, दुर्गेश नंदिनी – बकीमचंद्र चटर्जी
- व्हाय. आय. एम. अॅन अॅथीस्ट – भगतसिंग
- प्रिझन डायरी, समाजवादच का? – जयप्रकाश नारायण
- अस्वाब-ए-बगावत – सय्यद अहमद खान
- प्रेझेंट स्टेट ऑफ इंडियन पॉलिटिक्स – सय्यद अहमद खान
- राष्ट्रीय सभेचा अधिकृत इतिहास –पट्टाभिसितारामय्या
- द व्हील ऑफ हिस्टरी – राम मनोहर लोहिया
- पाव्हर्टी अँड अनब्रिटीश रूल इन इंडिया –दादाभाई नौरोजी
- बंदीजीवन – सचिन्द्रनाथ संन्याल
- ब्रोकन विंग्ज, बर्ड ऑफ टाइम, गोल्डन थ्रेशहोल्ड – सरोजिनी नायडू
- नील दर्पण – दीनबंधू मित्र
- भारत दुर्दशा – भारतेन्द्रू हरिश्चंद्र
- माय एक्सपेरीमेंट विथ टूथ, हिंद स्वराज –महात्मा गांधी
- साऊथ आफ्रिकाज फ्रिडम स्ट्रगल – युसूफ मोहम्मद दादु
- अनहॅपी इंडिया, इंडियन इन्फोर्मेशन ब्युरो, यंग इंडिया, इंग्ल ड्ज डेट टू इंडिया – लाला लजपतराय
- द स्टोरी ऑफ माय डिपोर्टेशन – लाला लजपतराय
- द पॉलिटिकल फ्युचर ऑफ इंडिया – लाला लजपतराय
- भवानी मंदिर – बारिन्द्र घोष
- गीतांजली – रविंद्रनाथ टागोर
- आय फॉलो द महात्मा – के.एस. मुन्शी
- विधवा विवाह (विडो मॅरेज) – ईश्वरचंद्र विद्यासागर
- इंडियन पॉलिटिक्स सिन्स म्युटिनी – सी.वाय. चिंतामणी
- आय.एन.ए. अँड इट्स नेताजी – शहानवाज खान
- रिव्हाव्हायिंग अवर डायिंग प्लॅनेट – सरला बेन
- माय इंडियन इयर्स – लॉर्ड हर्डिंग्ज
- अखंड हिंदुस्थान – कन्हैयालाल मुन्शी
- निहिलीस्ट रहस्य स्वदेशी रंग – रामप्रसाद बिस्मील
- वर्तमान रणनीती – अविनाश भट्टाचार्य
- बॉम्ब पोथी – सेनापती बापट
- गांधीइझम:अॅन अॅनालिसिस – फिलीप स्प्रेट
- द अवेकनिंग ऑफ इंडिया – रॅम्से मॅकडोनाल्ड
- काँग्रेस मिनिस्ट्रीज अॅट वर्क – आचार्य जुगलकिशोर
- दी वे आऊट, 1943 – सी. राजगोपालाचारी
- इंट्रोडक्शन टू इंडियन पॉलिटिक्स – डब्ल्यू. सी. बॅनर्जी
- मेमॉयर्स ऑफ माय लाईफ अँड टाइम – बी.सी. पाल
- गव्हर्नमेंट ऑफ इंडिया – सी.पी. इल्बर्ट
- इंडियन अनरेस्ट – व्हॅलंटीन चिरोल
- इंडिया अॅज आय नो इट – मायकेल ओडवायर
- भारतीय मुसलमान, इंडिया अंडर ड क्वीन –विल्यम हंटर
- हू वेअर दी शुद्रास?, बुद्ध अँड हिस धम्म – डॉ. बाबासाहेब आंबेडकर
साभार:- Mpsc world (यशाचा राजमार्ग)
Thursday, January 10, 2019
असंच काहितरी.......#दारुबंदी
कशाला हवी दारु
घरी उपाशी मरते पारु.....।।
-----------------------------------
दारुपायी दादला मह्या
पार गेला वाया.....
मायबाप सरकार
दाखवा की जरा दया...।।
-----------------------------------
जागोजागी सरकार
दुकान थाटा म्हणते
रस्त्याच्या कडेला
दारु वाटा म्हणते......।।
------------------------------------
एक दिली नोट
की मिळते दोन घोट
नाचु लागतो राजा
करुन वर बोट...
राणी असते घरी
रिकामे तिचे पोट
तुम्हीच सांगा सरकार
द्यायचं का मग वोट.....।।
--------------------------------------
महादेवाच्या पिंडीला
घालीत होते पाणी.....
जागोजागी वाजतीया
दारुचीच गाणी.....।।
--------------------------------------
इवल्या इवल्या झाडांचीबी
पानं झडलेली........
कोवळ्या कोवळ्या वयात
त्यांनाबी चढलेली......।।
---------------------------------------
इवले इवले हरीण
त्याचे इवले इवले पाय
ऐकलंत काय ऐकलंत काय
दारुबंदी आता होणार हाय.......।।
---------------------------------------
#असंच काहितरी.....
शशिकांत शांताबाई मारोती बाबर
घरी उपाशी मरते पारु.....।।
-----------------------------------
दारुपायी दादला मह्या
पार गेला वाया.....
मायबाप सरकार
दाखवा की जरा दया...।।
-----------------------------------
जागोजागी सरकार
दुकान थाटा म्हणते
रस्त्याच्या कडेला
दारु वाटा म्हणते......।।
------------------------------------
एक दिली नोट
की मिळते दोन घोट
नाचु लागतो राजा
करुन वर बोट...
राणी असते घरी
रिकामे तिचे पोट
तुम्हीच सांगा सरकार
द्यायचं का मग वोट.....।।
--------------------------------------
महादेवाच्या पिंडीला
घालीत होते पाणी.....
जागोजागी वाजतीया
दारुचीच गाणी.....।।
--------------------------------------
इवल्या इवल्या झाडांचीबी
पानं झडलेली........
कोवळ्या कोवळ्या वयात
त्यांनाबी चढलेली......।।
---------------------------------------
इवले इवले हरीण
त्याचे इवले इवले पाय
ऐकलंत काय ऐकलंत काय
दारुबंदी आता होणार हाय.......।।
---------------------------------------
#असंच काहितरी.....
शशिकांत शांताबाई मारोती बाबर
Monday, January 7, 2019
लोकनिर्माण १(२५ डिसें २०१८- ३ जाने. २०१९)
शिबीराची माहिती मिळाली ... शेवटच्या तारखेला फाॅर्म भरला (इंजिनियर आहोत लास्ट नाईटची सवय दुसरं काय...?)... पाच - सहा दिवसांनी यादी लागली... यादीत माझं नाव.... अन् प्रवासासाठी आतुरलेली माझ्या मनात एक नाव... असं काहीसं चिञ माझं शिबीराला जाण्याआधी होतं....
तब्बल २० - २२ तासांचा रेल्वे+बसचा प्रवास करुन चिखलगावला राञी ८:३० च्या सुमारास पोहचलो. स्डँट वरती जाई ताईला घ्यायला आलेली गाडी... अन् त्यातच बसुन मी व माझा पार्टनर (रमेश) निवासस्थळी आलो. गौतम व प्रदिप गाडीत आलेले .... त्यानंतर सौरभने जेवायला नेले... जेवण झाल्यावरचा प्रसंग कधीही न विसरण्यासारखा.... ताटात अन्न शिल्लक राहिलंय म्हणुन ते पुर्ण खायला लावणारी तेजल आजही समोर दिसते आहे.. मी खाऊन दाखवु म्हणतानाचा तिचा करारीपणा ... आम्ही पहिला धडा येथे घेतला. अन्न वाया न घालवण्याचा. त्यांनंतर झोपण्यासाठी गेलो. आम्ही एक दिवस आधीच ( म्हणजे २४ /१२) पोहचलेलो. म्हणुन दुसर्यादिवशी सकाळी थोडं मनासारखं झोपता आलं पण सेवाधार्यांचा लगेच आवाज , आज झोपा पण उद्यापासुन ४:३० ला उठायचं आहे. तेंव्हा खरंतर आपण फार कचाट्यात पडलो असं वाटलं राव.
दुसर्यादिवशी सकाळपासुन शिबिरार्थी यायला सुरवात झाली व हळुहळु गर्दी वाढू लागली. दुपारी ३ पर्यंत आपल्या प्रियजनांशी बोलुन घ्या त्यानंतर मोबाईल जमा केले जातील अशी सुचना फळ्यावर लिहिली गेली. अन् आम्ही थोडे अस्वस्थ झालो होतो. घरी फोन करुन पुढे १० दिवस संपर्क होणार नाही , असे सांगितले. काही संपर्क करता आले नाही , ते झाले नाहीत( असो. ते इथे सांगता येणार नाही ). चार वाजता आपण स्वतः बनवलेल्या कागदी पिशवीमध्ये मोबाईल , पाॅकेट टाकुन जमा केले व नोंदणी केली. खरंतर फाॅर्म भरल्यापासुन , निवड होणं , प्रवासाची तिकिटं काढणं , WhatsAppवरती ग्रुप बनवणं अन् त्या माध्यमातुन वेगवेगळ्या Activities करणं या सगळ्यामधुन शिबीर एक प्रकारे चालुच झालं होतं.... पण ती नोंदणी होती लोकनिर्माण भवनात पुढील १० दिवस चालणार्या साधनेची, तरुणाईच्या निर्माणाची , निर्मितीक्षम तरुणाई घडवण्याची......
अशाप्रकारे नोंदणी करुन राञी ७ वाजता सगळ्यांना एकञित करण्यात आले. प्रत्येकाने आपली ओळख करुन द्यायची होती. पण नाव सांगण्याची पद्धत माञ निराळी होती.... जन्म देणार्या आई वडिलांपेक्षा आडनाव मोठं नाही , म्हणुन आपलं नाव आईचं नाव व वडिलांच नाव अशा पद्दतीने नाव सांगायचे होते. हा आमच्यासाठी एक धडाच होता.
सगळ्यांची ओळख झाल्यानंतर पुढील दहा दिवसाचा एक साधारण दिनक्रम आम्हाला सांगण्यात आला. सकाळी ४:४५ ते राञी १२ असा साधारण दिनक्रम होता. आम्ही आश्चर्यचकित झालो होतो. फक्त पावणे पाच तास झोप ..? असे डोक्यात आले पण आपण इथे झोपण्यासाठी नव्हे तर जागं होण्यासाठी आलोय असं ठरवुन सारं दुर सारुन झोपायला गेलो. दरम्यान आमच्या टिम तयार केल्या गेल्या होत्या. एकुण ७ टिम. माझी टिम क्रमांक ५(मृदगंध). त्यानंतर टिमनुसार बसुन शिबिर गीत देखील गायले होते. जे ऐकता क्षणीच माझ्या काळजावर कोरले गेले ( विकसीत व्हावे , अर्पित होऊनी जावे....)
दुसर्या दिवशी पासुन सकाळी ४:४५ ला सुंदर गाण्यांनी येणारी जाग एक वेगळं जग उभं करायची अन् प्रत्येक जण तरारुन उठायचा. त्यानंतर मिळणारे गरम पाणी( चहा नाही) , योगा हे सारं माझ्यासाठी तरी नवीनच होतं.... असं कधीही काहीच मी केलेलं नव्हतं.... सकाळी लवकर उठण्याचे कित्येक प्रयोग फसलेले ..... माणसं एवढ्या सकाळी उठतातच कशी ? हा माझ्या घशी न उतरणारा प्रश्न , गरम पाणी काय पिण्यासाठी असते...? मग अंघोळीला काय वापरायचे...? अन् योगा.... ते तर आपल्याला कधि जमलंच नाही.... तेंव्हा सकाळ पासुन सुरु झालेल्या सार्या गोष्टी माझ्यासाठी नविनच होत्या अन् खरतर त्यातुनच जास्त आनंद येत होता.
त्यानंतर ६ वाजता डाॅ. दांडेकरांचं 'लोकसाधनेचा प्रवास' हे सञ... ज्यात राजाभाऊ अगदी सहजपणे त्यांच्या आयुष्याची एक एक घडी दिवसागणिक उलगडत गेले... असंख्य आठवणी सांगितल्या ... लहानपणी घरी असताना पडलेले संस्कार जसे की जे काम आपल्याला येत नसेल ते इतरांना करायला सांगायचं नाही हा दंडक असेल किंवा जो कष्ट करतो त्यालाच खाण्याचा अधिकार आहे , अन्नाचा एक शितही वाया घालवायचा नाही , त्यांनी आमच्यावरही न कळत केले अन् डाॅ. राजाभाऊ आमचे बाबा झाले.....
त्यानंतर ७ - ९:२५ पर्यंत श्रमदान असायचं.... ज्यात टिमनुसार काम दिलं जायचं . सारे टिम मेंबर मिळुन काम करण्यासाठी एकमेकांना करत असलेली मदत , तो समन्वय खरंच अप्रतिम होता. त्यातही आमच्या टिम बद्दल काय सांगावे...( टिम ५ समजुन घ्या)
श्रमदानानंतर आमच्यापैकीच एका टिमने बनवलेला स्वादिष्ट नाश्ता ( कष्ट केल्यावर मिळणार्या भाकरीला एक वेगळीच चव असते... याचा अनुभव तेंव्हा काहीसा आला) व नंतर एक तास आराम.(११ वाजेपर्यंत , नव्हे १०:५५ पर्यंतच) वेळेचे भान ठेवणारे सर्वच सेवाधारी अन् तेच भान आपणही राखायला हवं म्हणुन पहिल्या दिवशी पाच मिनीट उशीर झाला तेंव्हा ५×१२०=६०० मिनिट तुम्ही वाया घातलेत असं सांगणारा प्रविण कसा विसरता येईल. आरामासाठी दिलेला हा एक तास खरंतर अंघोळ , G.D. , Creative expression ची तयारी यासाठी देखील उपयोगी यायचा... त्यांनंतर ११ वाजता पावलांपुरता प्रकाश निर्माण करत आज अनेक पावलांना वाट दाखवणारे काजवे यायचे आमच्या भेटीला, त्यांची मनोगते व त्यावर प्रश्नोत्तरे चांगलीच चालायची... त्यानंतर १२:३० - १:३० हा एक तास दुपारच्या जेवणासाठी असायचा. १:३० - २:०० ही परत आरामाची वेळ. त्यानंतर २- ३:३० या वेळात तज्ञांचे भाषण वा एखादी कृती , त्यानंतर परत पुढे दिड तास दुसरी activitiesचालायच्या. ५ वाजता मिळणारे शरबत किंवा काढा व लगेच सुरु होणारे ग्रुप डिस्कशन (G.D.) ज्यात रोज एका विषयावर एक टिम चर्चा करायची.... त्या अनुषंगाने इतरजण त्यांना प्रश्न देखील विचारायची व त्याला मिळणारी उत्तरं त्या सञाची रंगत वाढवायची....
यानंतर परत ६:००-७:३० या वेळेत एक वेगळी , छानशी Activity असायची. त्यानंतर राञीचे जेवण ... थोडासा आराम.... व लगेच ९:०० - १०:३० या वेळेत तज्ञांचे भाषण. या सञात माञ जरा गंमत व्हायची . जेवल्यानंतर जवळपास सगळ्यांना झोप यायची ,अन् मग सगळे मस्त डुलक्या द्यायची , पेंगायची.... माञ एक दिवस वकिल साहेबांनी (कैवल्य दादा - बाबाचे चिरंजीव ) यामुळे सगळ्यांना चांगलेच धारेवर धरले. *" इथे आलेला प्रत्येक माणुस हा त्या त्या श्रेञात सर्वस्व वाहुन घेतलेला आहे. तो इथे पोटतिडकेने सांगतोय आणि आपण पेंगतोय हा त्याचा अपमान आहे. मला हे कदापी सहन होणार नाही. आपले शरीर हे आपले शरीर आहे. त्यावर नियंञण मिळवताच आले पाहिजे. आपण जर झोप नियंञीत करु शकत नसु तर कुठल्या समाजसेवेच्या गप्पा आपण मारतोय , हे ज्याचं त्यानं पहावं..."* असे खडे बोल सुनावले अन् तुम्हाला काय शिक्षा हवीये ते तुम्हीच सांगा असं सांगितलं.... यावर एक तास अधिक श्रमदान कराण्याची तयारी सर्वांनी दाखवली.. यात आमच्या टिमला दुसर्यादिवशीचा सकाळ , दुपारचा स्वयंपाक होता म्हणुन श्रमदान नव्हते तेंव्हा आम्ही त्यातुन सुटलो... पण आपल्या शरीरावर आपल्याला नियंञण करता आलं पाहिजे हा धडा कायमचा लक्षात राहिलाय... सगळ्यांच्याच.....
यानंतर असायचे Creative expression.... १०:३० - ११:०० पर्यंत ... रोज वेगवेगळ्या टिमचे सादरीकरण असायचे. सकाळी एक शब्द दिला जायचा ,त्यावर सादरीकरण करावे लागे. पहिल्याच दिवशी आमच्या टिमचे creative expression होते.…
शब्द होता- Depression....
शब्द वाचुन आम्हीच डिप्रेशन मध्ये जातो की काय असं वाटलं... पण चर्चेतुन एक नाटिका सादरी करायची ठरवली . काहीकारणास्तव पहिल्यादिवशी झालेनाही व दुसर्या दिवशी वेळ दिला गेला. तेंव्हा दिलेल्या वेळेत २ मिनिट. जास्त घेत उत्तम पद्धतीने नाटिका सादर केली , ज्यात राहुलचा रोल करणारा रुषी , रुषी नव्हे तर राहुल म्हणुन सगळ्यांना माहित झाला , मी चांगले निवेदन करु शकतो असेही तेंव्हाच मला कळले... खरंतर हेच लोकनिर्माण आहे , स्वतःला स्वतःचा शोध लागण्याचा काळ हा सर्वोत्तम काळ असं मला वाटतं....
या सांस्कृतिक मेजवानीनंतर सगळ्यांची झोप उडालेली असायची व नंतर असायची राञ भ्रमंती..... पहिल्याच दिवशीची ती गुहेतली activity कित्येक जणांना भावनिक करुन गेली.... प्रविण तुझा शब्द न शब्द फक्त कानात नव्हे तर काळजात उतरत होता म्हणुन पोरं मोकळी झाली , बिनधास्त रडली... शांत गुहा , मंद वारा , शितल चांदणे अन् रातकिड्यांचे गाणे यात कित्येक हुंदके त्या राञी मी ऐकले.... अशा राञी कधी आमच्या आयुष्यात आल्याच नव्हत्या... त्या लोकनिर्माण मुळे व तरुणाई मुळे आल्या....
दररोज होणार्या एकापेक्षा एक सरस activities, ज्यात confession असेल , J Q K असेल , शादी का लड्डु असेल , आणखी कितितरी ज्या खोल बसल्यात मनात घर करुन. सारेच अगदी भन्नाट , मस्त अन् अप्रतिम.... ज्यागोष्टींवर कधी बोललोच नाही अशा गोष्टींवर बोलतं केलं गेलं , ज्या गोष्टीचा कधीच विचार नाही केला त्याचा विचार केला , आयुष्यात माफी मागता यायला हवी अन् माफही करता यायला हवे हेही धडे या शिबीरानं दिले.
शिबिरातील सारेच सेवाधारी , वेळेची जाण व भान ठेऊन सार्या activities नियोजित करणारा प्रविण , जग प्रेमानं जिंकता येतं याचं चालतं बोलतं उदाहरण म्हणजे अभि दादा... एखाद्याला त्याची चुक प्रथमदर्शी न सांगता त्याच्याकडुन ती वदवुन घेणे हे रेड्यामुखी वेद वदवण्यापेक्षाही महाकठीण काम , हे काम अभि दादा सहज करतो.... भारत माता की जय हे घोषणाच ज्याचं घोषवाक्य आहे असं म्हटलं तर वावगं ठरु नये असा निसर्गप्रेमी शिवा दादा... असंख्य संकटे झेलत , संघर्ष करत इतरांच्या ओठी सुखाची गाणी यावीत म्हणुन प्रार्थना गाणारा विष्णु (डार्लिंग).... मी कुठला हे ओळखुच येत नाही , मी जिथं जातो तिथला होतो असं म्हणणारा पुष्कराज दादा , शांतपणे आपलं काम करणारा अन् स्वयंपाक घर सांभाळणारा , सर्वांना रुचकर कोंकणी जेवण खाऊ घालणारा विकास दादा , गौतम दादा , प्रविण दादा , प्रदिप , समीर सर , तेजल , धनश्री , प्रतीक्षा , रुपाली , ही सारी तरुणाई खरंच अवलिया आहेत सारेच्या सारे.......
समाजसेवेसाठी वाहुन घेतलेल्या दांडेकर परिवाराची चौथी पिढी अर्थात कैवल्य दादा व धनश्री ताई हे वेळप्रसंगी कान पिळणारे पण प्रेमाने गोंजारणारे देखील......
एका क्षणात रागावणारे व क्षणात प्रेम जागवणारे ही माणसं म्हणजे अजब रसायन आहेत खरंच.....
आणी हे सगळे ज्या वटवृक्षाखाली निवांत आहेत ते पाषाणावर पालवी फुलवणारे राजाभाऊ व रेणुताई हे दांपत्य.....
ही सगळी लोकसेवेसाठी स्वतःला वाहुन घेत लोकनिर्माणाची शपथ घेतलेले लोकसाधना करणारे लोकसाधक आहेत .... यांच्या साधनेपुढे आपण केवळ नतमस्तक होऊ शकतो एवढेच....
अन् यांचाच वसा अन् वारसा घेत लोकनिर्माण चे हे व्रत आपणही हाती धरु शकतो.....
आणि हो , माझी टिम (मृदगंध) :-
- सिंगर(सिंगल) सोलापुरे, अॅग्री काॅस सबका बाॅस म्हणत मिरवणारी बोलकी चिमणी सिमा , अर्थतज्ञ व टिपिकल गावठी मुलगी (मला वाटणारी) विद्या , वेळेवर माझी डाॅक्टर होऊन मला टॅब्लेट देणारी निकिता , मी स्टेजवर सोडून कुठेही येते म्हणारी जळगावची दिपाली , upsc aspirant सिन्सियर वगैरे म्हणता येईल अशी डोंबिवलीची नमिता , आमचा कवि मिञ प्रशांत , पञकार रुषी , शांत व मितभाषी ऋषभ , मेकॅनिकल इंजिनियर योगेश , परभणीचा अक्षय , कॅमेरामॅन देव , कोल्हापुर गॅंगचा मेंबर ओंमकार आणि सगळ्यात लहान पण मोठमोठी भांडी घासायची , त्यांना माती लावायची त्यानेच मला शिकवले , तो आमचा बारक्या प्रथमेश हे सारेच वेगवेगळे नमुने होते... प्रत्येकाचं वागणं , बोलणं ,जगणं सारंच एकमेवाव्दितीय ....
यांच्या सोबत जगलेले १० दिवस आयुष्यभरासाठी स्मरणात राहतील... अध्यक्ष ... म्हणणारा सुनिल , महोदय म्हणणारा रुषी , ओ लिडर म्हणत ओरडणारी सिमा अन् सारेच...... यांच्यासोबत घासलेली भांडी , केलेला स्वयंपाक , करपलेल्या चपात्या , डोळ्यातुन पाणी आणणारा धुर , संडास बाथरुमची सफाई , श्रमदान हे अगदी अविस्मरणीयच....
यात बर्याच गोष्टी अजुनही अनुल्लेखीत राहिल्या आहेत जसे की समुद्र सफर , 31st celebration , ती दिल की दरिया दिली , कॅम्प फायर , सामुहिक नृत्य , कवितांची मैफिल , अन् एक तारखेची ती राञ .... हे सारे शब्दातीत आहे... यांना शब्दात बंदिस्त कसे करावे हाच प्रश्न आहे.... या प्रत्येकाने एक वेगळा कोपरा व्यापलाय माझ्या मनाचा..... खरंच त्याला तसेच राहु देऊ.... बाकी जे शिकलो , जे या १० दिवसात जगलो ते पुन्हा जगता येईल का हाच प्रश्न आहे .....?
अन् तसे जगता आले अगदी होऊनी निर्मम तर तीच असेल खरी लोकनिर्माणाची नांदी ....
बाकी वेगवेगळ्या क्षेञातल्या वेगवेगळ्या उंचीवरच्या माणसांच्या सहवासाने व त्यांच्या वेगवेगळ्या विषयावरच्या वेगवेगळ्या चर्चासञांमधुन आपल्याही आयुष्याला एक वेगळे वळण मिळेल या हेतुने या आगळ्या वेगळ्या शिबिराला यायचे होते असे मी शिबीराच्या पहिल्यादिवशी सांगितल्याचे आठवते... अन् आज ते परतल्यानंतर तो हेतु पुर्ण झाल्याचे पुर्ण समाधान तर आहेच त्या बरोबर या शिबीरानं काय शिकवलं ? तर जगणं शिकवलं एवढंच उत्तर देऊ शकेल... कारण नेमकं व मोजकं बोलायलाही यांनीच शिकवलं.
लोकनिर्माण व टिम तरुणाई आपला कायम ऋणी असेल.......
शशिकांत शांताबाई मारोती बाबर
जालना( ह.मु. जळगाव)
Sunday, January 6, 2019
सिंधुताई - लाखोंची माय
जिनं सोसलेला जाळ
जिनं उपसलेला गाळ
जिनं तासलं रं भाळ
हात जोडुनी तिच्या
उभा राहिला रं काळ..........।।
जिच्या काळजात धग
जिचं न्यारंच होतं जग
कधी सोडली ना तग
तिला एकदा बघ................।।
केली शेकोटी दुःखाची
लावली वेदनेला आग
दुर सारुनी वाटेवरचे काटे
तिनं आज फुलविली बाग.....।।
जवा फेकली जगाने
आग तिच्या अंगावर
तिनं शेकली भाकरी
त्याच फेकल्या आगीवर......।।
गोठवणार्या गारव्यात
करुनी गोळा पालापाचोळा
तिनं भरली मातीची रं ओटी
जाळुनी त्यास मग तिनं
पेटवली रं शेकोटी......….....।।
कचपटासारखं जिणं
जिनं कधी स्विकारलंच नाही
तिनं उभं केलेलं आजचं जग
आपोआप साकारलंच नाही...।।
या तिच्या जगामागं
जगावरचा राग होता
लाखोंची माय होण्यासाठी
पोटच्या लेकीचा त्याग होता..।।
शेकताना हात पाय
जवा बघितली सिंधुताई
दिसु लागल्या मला
गोठ्यातुन हंबरणार्या गाई...।।
एक ती मसणातली शेकोटी
अन् आजची ही शेकोटी
किती फरक कोटी कोटी......
घराबाहेर हाकलेली सिंधु
आज किती बिंदुंना जोडते आहे
उत्तरेतली सिंधु असेलही मोठी
पण माझ्या महाराष्ट्रात
एक मायेची सिंधु आज वाहते आहे..।।
पाहिलं असतं कुणी तुला
त्या सरणावर भाकरी शेकताना
विचारलं असतं, सिंधु तु काय झालीस......
पण आज पाहुन इथं तुला शेकताना शेकोटी जवळ
मी सांगु शकतो , ताई तु लाखोंची माय झालीस.....।।
निघालीस घरुन तेंव्हा
तुझ्याकडं काय होतं..?
पोटाशी लेकरु
अन् पोट रिकामं होतं......।।
रिकाम्या पोटासरशी
तु लढलीस सिंधुताई
तवा कुठं लाखोंची माय
तु घडलीस माई ........।।
एका एका दुःखाला आमुच्या
आता आम्हीबी चेतवणार ताई
वेदनेची शेकोटी आमच्या
आम्हीबी करणार माई.......।।
इतरांच्या सुखात सुख
आम्हीबी आता बघणार ताई
स्वतःसाठी नव्हे तर इतरांसाठी
आम्हीबी आता जगणार माई....।।
कवि:- शशिकांत शांताबाई मारोती बाबर
(लिड इंडिया २०२०- जळगाव)
Saturday, January 5, 2019
Subscribe to:
Posts (Atom)