21 जुलै 2022 रोजी ऐतिहासिक घटना घडली. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एक आदिवासी महिला देशाच्या सर्वोच्च स्थानी विराजमान झाली. पण इतक्याने हुरळुन जायचे कारण नाही, कारण एवढ्याने सारा आदिवासी समाज विकसित झाला, महिलांचे सगळे प्रश्न मिटले असे होत नाही, याचाही विचार झाला पाहिजे. एकीकडे आदिवासी सर्वोच्च स्थानावर बसवायचे अन् त्यांच्याच सहीने आदिवासींच्या हक्कांवर गदा आणणारा जंगल अधिकार (सुधारणा) कायदा आणायचा.(Forest Rights Act 2006)असे होऊ नये. महिला राष्ट्रपति असेल पण साधारण महिला सुरक्षित नसेल तर हा मोठेपणा उपयोगाचा नाही. अर्थात यातुन एकगोष्ट चांगली झाली. सर्वधर्मसमभाव जपणारा, विविधतेने नटलेला माझा देश खरंच किती मोठीच नव्हे तर महान लोकशाही आहे, हे आपण तुर्तास अधोरेखित केले. राष्ट्रपति हे पद रबरी स्टँम्प म्हणुन बर्याचदा हिणवले जाते, ते तसे नाही हे दाखवुन देण्याचे प्रसंग आपल्या कार्यकाळात नक्कीच येतील अन् आपणंही त्याप्रसंगी सामान्यांचा लोकशाहीवरचा विश्वास दृढ होईल, असेच चिञ आमच्या समोर उभे कराल, या अपेक्षसह आपल्याला खुप खुप शुभेच्छा राष्ट्रपति महोदया....!!
खुप खुप अभिनंदन महामहिम राष्ट्रपती साहिबा.....🌹🌹🌹
No comments:
Post a Comment