परिक्षाच विचारते, बघ माझी आठवण येते का ? तेंव्हा, 👇👇
(कवि सौमिञ यांची माफी मागुन.....)
लायब्ररीत जाऊन खुर्चीत बसुन रहा
बघ माझी आठवण येते का ?
हात लांबव, लांबचं पुस्तक जवळ घे
घेतल्यासरशी उघडुन पहा
बघ माझी आठवण येते का ?
वाचु लाग, समजेल काही उमजेल काही
नाहीच उमजलं तर
डोळे मिटुन घे, चिंतन मनन कर
नाहीच समजलं तरीही तर बाहेर पड, टपरीवर ये
चहा उफाणलेला असेलंच, गर्दीत जागा करुन उभा रहा
चहासोबत आत्ता वाचलेलं आठवुन पहा
बघ माझी आठवण येते का ?
आता परत चालु लाग, गर्दीचे अगणित धक्के खाऊन घे
वाचलेलं आठवेपर्यंत चालत रहा, ते आठवणार नाहीच, रुमवर ये
कपडे बदलु नकोस, डोकं लावु नकोस, पुन्हा खुर्चीत बस
आता दुसरा विषय हाती घेऊन पहा
बघ माझी आठवण येते का ?
दार वाजेल, दार उघड, रुम पार्टनर असेल
त्याला काहीही बोलु नकोस, तो चारपैकीच एक असेल
तुला विचारेल लवकर रुमवर येण्याच कारण,
तु सांग डोकं गरगरतय
मग हळुच आपापल्या खुर्चीत बसा
तो एखादा पीवायक्यु विचारेल, माहित नाही सांग
आता पुन्हा पुस्तक वाचु लाग
बघ माझी आठवण येते का ?
मग राञ होईल, तो लाईट बंद करेल, झोपायचय म्हणेल
तुही तसंच कर, झोपायला जा
विजांचा कडकडाट होईल, ढगांचा गडगडाट होईल
पावसाच्या आवाजासरशी तुला गाव आठवेल
गावातला बापाचा मानमरातब अन् नाव आठवेल
झोप लागणार नाही, एखादं लेक्चर पहा
बघं माझी आठवण येते का ...?
यानंतर सताड डोळ्यांनी स्वप्न पाहायला विसरु नकोस
स्वप्न जागं होईल, झोप मागं जाईल
उशीर झाला असला तरी आता झेपावण्याचा प्रयत्न कर
पुस्तक उशाला घेऊन का होईना, झोपण्याचा प्रयत्न कर
मी अशी तोंडावर आल्यावर तरी, बघ माझी आठवण येते का ?
#असंच काहितरी
No comments:
Post a Comment