Thursday, April 6, 2023

प्रिय सागर...छे..महासागर ❤


जिथं लोकं गर्दीत हरवुन जातात, अशा स्पर्धा परिक्षेच्या पंढरीत मला सापडलेला गोरागोमटा विठ्ठल....पहिल्याच भेटीत जणु जन्मोजन्मीचे संबंध असावेत अशा आपुलकीने माझ्याशी बोलणारा मित्र...आपला अंदाज कधीच चुकत नाही असं सांगत पहिल्याच भेटीत तुला पोस्ट नक्की भेटेल असं सांगत, माझं भरभरुन कौतुक करणारा अन् इतरांनाही माझ्याबद्दल सांगणारा मित्र... अनपेक्षितपणे भेटलेला अन् पुण्याच्या वातावरणात जिथं लोकं पत्ता विचारला तरी नीट सांगत नाही तिथं पत्ता विचारल्यावर नुसता‌ मार्ग न दाखवता तिथपर्यंत पोहचवणारा वाटसरू....पोलिसाचा मुलगा असुनही न बिघडणाऱ्या अपवादांपैकी एक असणारा अपवाद..पहिल्या भेटीनंतरच काळजात घर करणारा अवलिया.... यशोमतीच्या धुरंधरांमध्ये माझ्यासारख्या सैनिकाची भरती करणारा कप्तान... पायाभूत प्रशिक्षणादरम्यान माझ्यासारख्या कधीच बाहेरचं जग जास्त न बघितलेल्या खेड्यातल्या मुलाला आपल्या सोबत सगळीकडे फिरवणारा जिप्सी...प्रशिक्षण म्हणजे दुसरे काॅलेजच असं सांगून आता नाहीतर कधी फिरणार, असं सांगत बरेच सुरेख बेत अगदी नियोजनपुर्ण आखुन भटकंती करत नवनवीन ठिकाणांना घेऊन जाणारा....वेगवेगळी ठिकाणं, वेगवेगळी माणसं यांना भेटवुन माझा अनुभव अधिक समृद्ध करणारा....पायाभूत प्रशिक्षणादरम्यान घोडी मागं शिंगरू फिरावं तसं सतत मला मागे मागे घेऊन फिरणारा... पुर्ण पायाभुत प्रशिक्षणादरम्यान महानगरीय माॅल, सिनेमागृह, अशा तोपर्यंत महागड्या वाटणाऱ्या अनेक गोष्टींचा अनुभव मला पैशाचं नाव न घेताही देणारा....कधीच‌ कुठला हिशोब न ठेवता तुला जमेल तेंव्हा दे म्हणत कायम मला हवी ती मदत करणारा.....स्वतः जितका सुंदर तितकेच सुंदर फोटो काढुन नैसर्गिक, अनैसर्गिक सौदर्याला आपल्या मोबाईलच्या कॅमऱ्यात कैद करणारा....सर्वांनाच हवाहवासा वाटणारा.... एकापेक्षा एक सुंदर व्लाॅग बनवत प्रशिक्षणाच्या क्षणांना चिरस्मृतीत जतन करुन ठेवणारा....आपल्या सुरेल आवाजाने थेट कानातुन काळजात‌ हात घालणारा गायक.... क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस अशा क्रिडा प्रकारापासुन सांस्कृतिक कार्यक्रमापर्यंत उत्साहात सहभाग घेणारा....मला सुञसंचालन करता येत नाही म्हणत शिवजयंतीच्या कार्यक्रमात आपल्या सुञसंचालनाने सर्वांचे लाड करणारा, आपल्या आवाजाने प्रक्षेकांना अंकीत करणारा....हे दिवस पुन्हा नाही म्हणत बिंधास्त जगणारा अन् तसेच जगा म्हणणारा....कक्ष अधिकारी हाच कलेक्टर आहे असं सांगत प्रांताधिकाऱ्यांना पण मंञालयातल्या फाईलमधल्या कागदासमान उडवुन लावणारा...बघता बघता आम्ही सचिव होऊन जाऊ असं सांगत कक्ष अधिकारी पदाला एका वेगळ्याच उंची नेऊन ठेवणारा... कुठे गाडी पकडली तर काका आम्ही कक्ष अधिकारी आहोत, या कधी मंञालयात म्हणत सहज आपली सुटका करुन घेणारा...फिटनेसच्या नादापायी अगदीच तोलुन मापुन खाणारा ...तरी खाण्याचा, पिण्याचा, पाहण्याचा, पोहण्याचा अन् अजुन बरेच नाद असलेला नादमयी नाव सागर असलं तरी मैञिच्या दुनियेतला माझ्यासाठी महासागर असलेला....आजचा कक्ष अधिकारी अन् उद्याचा सहसचिव सागर‌ मनोरे यास वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा.....सागरा महासागरासारखा आहेस असाच रहा...एकच काय तो फरक दोन महासागरात.. तो महासागर जरा खारट आहे, अन् हा निव्वळ गोड.....!!

माझ्या सारख्या चंद्राच्या प्रतिबिंबाला तुझ्या पाण्यात कायम सामावुन घेतलेस.... त्यासाठी अजुन काय बोलणार... बरेच काही सांगायचे राहून गेले...पण असु दे...महासागराचं वर्णन थेंबानं कसं करावं...तुर्तास इतकंच !!! खुप खुप शुभेच्छा मित्रा ❤️


#सागर #महासागर
#वाढदिवस_विशेष
#असंच_काहितरी

1 comment:

Saurabh Jadhav Patil said...

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा ♥💐