Sunday, August 14, 2016

स्वप्न

💥💥  *स्वप्न...*💥💥

एक होतं गाव
तिथे होतं एक ठुमदार घर
समोर छान बगीचा, एक मोठी कार
पाहायची स्वप्ने सारीच चंद्राची
गोष्टी इथल्या रती अन् इंद्राची ॥

तसच दुसरही होतं एक गाव
जरा दुर तटावर जाया तिथे नाव
तिथे माञ मिञा नव्हतं ठुमदार घर
कुठे होती झोपडी,कुठे भिंती लिंपती कर
यांना नव्हती कसली स्वप्न पडायची साखरेची
प्रश्न रोजच पडायचा,
काय खायचं अन् चिंता भाकरेची ॥

ही दोन गावं तशी पाहिली तर जवळ
पाहिली तर किसो दूर
एकीकडे पैशांचा धुर तर
 दुसरीकडे आसवांचा पुर
ही नव्हे कोण्या दंतकथेतली गावं
शोधल्यावर कळेल,ओळखीच वाटतील नावं
म्हणायला यांचा एकच आहे देश
दोघांच्याही हिशोबातला वेगळा आहे शेष
एक चकाकत्या इंडियातली स्मार्ट सिटी
दुसरीकडे कुपोषित भारताच्या नावाची पाटी ॥

आपण आपलं करायच असतं
आपण आपलं बघायच असतं
शेजारच्याशी आपलं देणंघेणं नसतं
हेच होतायत आमच्यावर संस्कार
म्हणुनच भेगाळल्यागत झाल्यात इथल्या वस्त्या
अन् दुभंगलीत इथली गावं ॥

सारा बिघडत चाललाय आकार अन् ऊकार
मग तुम्हीच सांगा कलाम सर
कसे अन् कधी होणार
स्वप्न तुमचे आमचे साकार ॥

*कवि:- शशिकांत मा. बाबर*
( बोररांजणीकर,जि. जालना)
संपर्क :-९१४०६२०८३४

No comments: