Monday, August 15, 2016

वेदना

📌😌 वेदना ... 😊📌

जे वेदांनाही जमले नाही
ते वेदना सांगुन जाते ।
गुंज अंतरीचे कानी
मग हळुच गाऊन जाते ॥

करते घायाळ अशी की
जणु वाघिण चावुन जाते ।
ही वेदनाच असते खरी
कोण खरे दावुन जाते ॥

करते मज अस्वस्थ हल्ली
उगाच घडीभर राहुन जाते ।
तिच्या जराश्या सहवासानेही
हास्य गालीचे वाहुन जाते ॥

अशी कशी ही चेटकीण
क्षणात सुख खाऊन जाते ।
आठवण माझी येता लगेच
परतण्या मजपाशी धावुन येते ॥

नकोच असते कोणालाही
उगा सोबती वेदना ।
पण सावलीसम सोबतीला
राहतेच ही वेदना ॥

कधी ओठांमधुन हळुच बाहेर
निघते थरथरत वेदना
कधी नयनी पापण्यांमध्ये
बसते दडुन वेदना ॥

✍शशिकांत मा. बाबर
📱९१३०६२०७३४

No comments: