Sunday, August 28, 2016

माफी मागु नकोस

🙏माफी मागु नकोस 🙏

            कवि :- शशिकांत मा. बाबर
            संपर्क :- ९१३०६२०८३४

सारा गाव झोपल्यावर तु माझ्याकडे ये
अलगद येवून मला तुझ्या मिठीत घे
एकदा का आलीस मिठीत
पुन्हा हात मोकळे करु नकोस ॥

हा बेभान वारा झोंबेलच तुला
पण म्हणुन घाबरायच कारण नाही
हे वारेही श्वासाहुन वेगळे धरु नकोस ॥

बर्याच दिसांचे तुला बोलायचे बरेच काही
सांगायचे तुला सारे खरेच काही
हरवेळी मी असचं ठरवतो काही बाही
पण कधी तु येत नाही, कधी शब्द ओठी येत नाही ॥

आज जर आलीच तु
तर लगेच कारणं विचारु नकोस
अन् मी नाहीच काही बोललो
तर लगेच परतीची वाट धरु नकोस ॥

अन् जर नाहीच जमलं तुला येणं
तर झोपेचं कारण सांगु नकोस
पुन्हा येईल म्हणत माफीही मागु नकोस ॥
www.shashichyamanatale.blogspot.com

No comments: