"तुमच्या बाबतीत जे घडतं, तो म्हणजे अनुभव नव्हे. तुमच्या बाबतीत जे घडतं, त्याचं तुम्ही जे काही करता ; तो म्हणजे अनुभव"
~ आल्डस हक्स्ले
आपण काय होतो किंवा काय आहोत, ह्याचा आपण काय होऊ शकतो ह्याच्याशी सुतरामा संबंध नसतो. आपल्याला जे पाहिजे ते आपण होऊ शकतो.
आयुष्यात दोनच पर्याय असतात : एकतर आयुष्याच्या प्रयोजनाला प्राधान्य देऊन आपल्या आवडी निवडींना दुय्यम स्थान द्या किंवा आवडीनिवडींना प्राधान्य देऊन आयुष्याच्या प्रयोजनाला दुय्यम स्थान द्या. आपण ठरवायचय आपल्याला कुणीही व्हायचय की कुणीतरी विशेष.
आपण सगळेच आयुष्यात जे काही बनतो ते केवळ कुणीतरी आपल्याबद्दल आपल्यापेक्षाही जास्त विश्वास बाळगतं म्हणुन.
कारण कधी परिणामाशी तुलना करत नाही.. शिक्षक कधी आपल्या विद्यार्थ्यांच्या यशाशी तुलना करत नाही.
चिकाटी धराल, तर प्रगती कराल.
"प्राधान्यांचा उभा क्रम लावणे थांबवा.मग करियर, मग कुटुंब, मग आरोग्य....वगैरे वगैरे... त्याबाबत क्षितिज समांतर दृष्टिकोन बाळगा. तुमचं करियर तुमच्या कुटुंबाइतकच महत्वाचं असतं... तुमच्या आरोग्याइतकंच तुमच्या आध्यात्मिक विकासाचं महत्व असतं..."
जगात चांगले लोकही असतात अन् यशस्वी लोकही असतात. पण थोर लोक ते जे यशस्वी झाल्यावरही चांगले राहता.
चांगलं नाव कमावुन वाईट आयुष्य जगण्यापेक्षा वाईट नाव कमावुन चांगलं आयुष्य जगा.
आपण वाचायला शिकतो... मग शिकायला वाचतो.
हि व अशी असंख्य आपलं जीवन बदलुन टाकणारी सुभाषितासम विधानं करणारं पुस्तक ... जीवन जगताना कुणीतरी बनायचं की कुणीतरी विशेष ? ह्याप्रश्नापासुन सुरवात करुन जगण्याच्या विविध टप्प्यावर कसे जगावे याचा मुलमंंञ विविध उदाहरणामधुन देत आपल्या जगण्याला दिशा देणारं पुस्तक.... म्हणजे महाञया रा यांचे "अधिकतमाहून अधिकतर" पुस्तक. अगदी छोटसं व आपल्याला पहिल्या पानापासुन शेवटच्या पानापर्यंत खिळवुन ठेवणारं असं हे पुस्तक आहे. महाञया रा यांचे "न पाठवलेलं पञ" हे पुस्तक नुकतेच वाचुन पुर्ण झाले होते...ह्या पुस्तकातले कित्येक विचार अगदी मनावर कोरले गेले.... त्याच पद्धतीचे व त्याच्याशी साधर्म्य असणारं दुसरं पुस्तक सुद्धा महाञया रा यांनी लिहिलेलं आहे, हे कळल्यानंतर ते वाचायलाच हवं असं वाटु लागलं आणि कदाचित आकर्षणाचा नियम लागु झाला असावा, मला ते पुस्तक मिळालं....मिळालं तसं दोन दिवसात वाचुन काढलं... खरंतर काढलं म्हणता येणार नाही..वाचुन आत रुतुन बसलं असं म्हणणं अधिक योग्य. वरची विधानं वाचल्यावर आपल्या सहज लक्षात येईल की प्रेरणेच असंख्य पाटच यात पानोपानी वाहतायत... आपण आपली ओंजळ भरायची अन् तहान भागवायची. पुस्तकात विविध विचार वेगवेगळ्या छोट्या छोट्या कथेच्या माध्यमातुन गुंफले आहेत. प्रत्येक कथेचा नायक आहे 'अव्यक्त'. हा अव्यक्त प्रत्येक कथेमध्ये विविध भुमिकेत आपल्याला दिसतो, कधी वडील, कधी कंपनीचा सल्लागार, कधी शिक्षक, कधी मिञ, कधी अजुन काही...भुमिका वेगवेगळ्या पण विचार तेच.. नाव जरी अव्यक्त असलं तरी तो जे विचार व्यक्त करतो ते लाख मोलाचे अन् आपल्याला रोजच्या जगण्यात पडणाऱ्या कित्येक प्रश्नांचे उत्तर देणारे आहेत. जगताना कायम अधिकतमाहुन अधिकतर मिळवण्यासाठी धडपडत रहावे...फक्त हे धडपडणं नुसतं धावणं नसावं...मिळणारे यश साजरे करण्यासाठी थांबता सुद्धा यायला हवं...अन् असं यश साजर करत करत सुखाच्या मार्गाने जगत रहावं...कारण लेखक म्हणतो त्याप्रमाणे सुखाकडे जाण्याचा मार्ग नसतो..सुख हाच मार्ग असतो.. हा मार्ग सापडावा...जगण्याचा महोत्सव व्हावा असं वाटणाऱ्या प्रत्येकाने अवश्य वाचावं असं पुस्तक..अवश्य वाचा. तुमचं अधिकतमाहून अधिकतर चिंततो...!
---------------------------------------------------------------------
पुस्तकातले काही उतारे 👇
#असंच_काहितरी
#Book_Review
2 comments:
उर्जा देणारा लेख 👌👍
धन्यवाद 🙏
Post a Comment