Tuesday, December 27, 2016

भेगा

*💥भेगा.........💥*

पायाला पडलेल्या भेगा पाहुन
माय आठवलीस तु...
अशाच कित्येक भेगा पडल्यात
तुझ्याही पायाला .....

पण म्हणुन तुला थोडच भेटतं
आरामात राहायला...
तुला ओढावाच लागतो गाडा .....
गोठवणार्या थंडीतही जागी होतेस तु
उठण्या अगोदर सारा वाडा ....

तु झाकत राहतेस सार्या भेगा
कारण तुझ्या नशिबी नाहित
आयत्या पिठावर मारणं रेघा ....
म्हणुन तु बुजवत राहतेस सारं...
कधी पायाच्या तर कधी जिंदगीच्या
पडल्यात ज्या भेगा.....

*✍शशि....*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

No comments: