संख्या.. इंजिनियरिंग...गुणवत्ता...
मिञांनो, बर्याच वेळा आपल्याला असं वारंवार ऎकायला मिळतं की हे खुप झालेत ते खुप झालेत ... त्याला काही किंमत राहिली नाही आता कुणीही तेच करतय... कधी काळी डिएड, बीएड च्या बाबतीत ऎकायला भेटायची ही वाक्य पण आता इंजीनियरींगच्या बाबतीत काहिस असच वातावरण आहे ... त्याला कारणही तसच आहे .... भरमसाट इंजीनियरिंग महाविद्यालय, पास झाला तो इंजीनियर होऊ शकतो अशी परिस्थिति इथल्या तथागतित शिक्षणसम्राटांनी करुन सोडलीय.. त्यामुळे उठ सुठ कुणीही इंजीनियरिंगला प्रवेश मिळवतो आहे .. अगदी काहि नाही जमलं तर इंजीनियरिंग तर आहेच .... पप्पाकुठेही आपल्याला प्रवेश मिळवुन देतील.. अशी मुलांची भावना आहे . या सगळ्यामुळे मग एखाद्या हुशार विद्यार्थ्यालाही त्याच गणतित धरले जाते ... कधी कधी तर असा अनुभव येतो की चक्क कुणी काय करतो विचारलं अन् आपण इंजीनियरिंग म्हटलं की पुढचा असा काहि नजर टाकुन पाहतो .. की आपल्या क्षणभर वाटतं साला खरच आपण काही चुकीच तर करत नाही ना..? यातुन आपल्याला जे पाहिजे ते साध्य होईल की नाही...? . पण हे सारं कशामुळे तर केवळ संख्या वाढल्याने ... म्हणजे नुसता संख्यात्मक विकास कुणालाच पटणारा नसतो ते यातुन दिसतं...
पण म्हणजे काही सगळे इंजीनियर हे असेच असतात असही नाही ... असो. काल परवाचा माझा स्वतःचाच अनुभव एका दुरच्या नातेवाईकाने विचारले, काय करतोस..? म्हटलं , इंजीनियरींग.. बिचारा लगेच शांत झाला .. पुढे काही विचारलच नाहि पण त्याचा चेहरा पाहुन मी स्वतःहुन म्हणालो की गव्हर्नमेंट ला आहे ... मग जरा कुठे त्याचा चेहरा बरा झाला... पण तरी तो न राहुन म्हटलाच , लय झाले पहा हे इंजीनियर आता.. जिकडं तिकडं सगळे इंजीनियरच .. मेडिकल वगैरे बगायच की रे .. मनात म्हटलं आता आपण न बोललेच बरं अन् मी हसुन उत्तर टाळल....
तर हे असं इंजीनियरिंग पुराण... बरं या नाव ठेवणारात सारेच काही शिक्षण क्षेञातले महान आत्मे नसतात.. ज्यांना मॅकेनिकल इंजीनियर अन् मॅकेनिक सारखाच वाटतो.. ज्यांना इलेक्ट्रीकल इंजीनियर अन् वायरमन सारखाच वाटतो.. ज्यांना सिव्हिल इंजीनियर म्हणजे गंवडी वाटतो..ज्यांना कंप्यूटर इंजीनियरिंग म्हणजे MS-CIT वाटते ते महानगही इंजीनियरींगच्या नावने बोंब मारण्यात काहि कसर सोडतं नाहित... तर असो हे असे इंजीनियरिंग पुराण.....
या सार्यांना कारणंही तशीच आहेत... इंजीनियरिंग वर अगदी चिञविचिञ संदेश माध्यमांद्वारे फिरताना दिसतात.. मालिका, सिनेमे यामध्ये दाखवली जाणारी इंजीनियरिंग महाविद्यालये.. हे सारं पाहुन मग लोकांना वाटत सगळीकडे असच चालतं .. त्यामुळे मग इंजीनियरिंगच्या बाबतीत लोकांचे असे मत तयार व्हायला लागते.. मागच्या काहि वर्षांपासुन तर इंजीनियरिंगच्या ५० % जागा रिक्त कुठे ६० % जागा रिक्त अशा बातम्या वारंवार दिसतात अन् मग आपल्या टक्केवारीच्या दुप्पट हजार भरुन ज्याला पाहिजे त्याला प्रवेश घेता येतो .. मग साहजिकच जे एवढं स्वस्त असेल ते लोकांना चांगल कसं वाटेल ..
पण या सार्यामुळे नाउमेद होण्याची मुळीच आवश्यकता नाहि. भलेही आज संख्या वाढली असेल पण गुणवत्ता माञ पाहिजे तेवढीच आहे .. आणि शेवटी कधीच स्कोप किंवा संधी ही एखाद्या कोर्स ला नसते ... ती तुमच्या गुणवत्तेला असते.. तुमच्यात गुणवत्ता असेल तर तुम्हाला कुणीच कमी लेखु शकत नाहि.. मग आजुबाजुला धावणारांची कितीही गर्दी राहो फक्त तुमच्या पायामध्ये ताकद पाहिजे म्हणजे यशाची क्षितिजं तेंव्हाच पादंक्रात करता येतात ... तिथे धावणारे कमी की जास्त याचा विचार करायचा नसतो फक्त आपल्याला आपल्या हिमतीवर पोहचायचय तेवढं ध्यानात ठेवलं की झालं...
शेवटी काय तर संख्या जास्त असली म्हणजे वाघ कमकुवत समजायचा अन् कमी असणारी पिलावळ श्रेष्ठ समजायची हा मुर्ख करण्यात काहिच अर्थ नसतो..... तस तर जगाची लोकसंख्या आज अब्जावधी झालीय मग माणुस म्हणुन आपली किंमत कमी झालीय.. तर नक्कीच नाही .... वाढणार्या संख्येबरोबरच आपलं वेगळं अस्तित्व आपण सिद्ध करायच आहे म्हणुनच तर कदाचित आपला जन्म झाला असेल ... एवढे कित्येक माणसं आहेतच मग काय ... आता माणसं लय झाली हो काही दुसरं बघायच की जन्माला येताना .... असा प्रश्न तर आपण जन्मणार्या बाळांना विचारणार नाही ना......?
✍शशि..( इंजीनियरच्या नजरेतुन पाहताना...)
No comments:
Post a Comment