Tuesday, December 27, 2016

पानगळ

*🍂🍂 पानगळ...🍂🍂*

पानांची पानगळ पाहताना
सहज पडतो प्रश्न मला
काळ खरच कसा निघुन जातो
बघता बघता ऋतु बदलतात
ऋतु सोबत वारे बदलतात
अन् एकदा का वारे बदलले की मग सारेच बदलतात
आपल्याच फांद्या मग आपल्यालाच दुर लोटतात
मनात मग नुसते उमाळे दाटतात

पण हसत हसत सारे स्विकारायचे असते
एकदा वेळ झाली की
आपले आपणच निघायचे असते

ना कसला खेद ना कुठली इर्षा
आपण उगवणारच नव्याने मातीतुन
फक्त पडावी एकदा मनाजोगी वर्षा.....
म्हणुनच तर वाटत नाही दुःख
त्या गळणार्या पानांनाही
कारण नव्यांच्या स्वागतासाठी
एवढा तर करावाच लागेल त्याग ......
तो तर आहे जगण्याचाच भाग

*✍शशि.......*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

No comments: