Tuesday, December 27, 2016

प्रश्न

*💥💥 प्रश्न...💥💥*

वेदनेला विव्हळताना पाहिले मी कैकदा
अश्रुंना अश्रुशी बोलताना, पाहिले मी कैकदा

आम्हा न फरक पडतो कशानेही सांगती जे ओरडुन
दुःख त्यांनाच जादा सलताना,
पाहिले मी कैकदा

खेळ ज्यांचा चाले काट्यांशी बिनदिक्कत
फुलांनी त्यांनाही टोचताना, पाहिले मी कैकदा

नाचती धुंदीत जे दुःखाच्या बेधुंदपणे
धुंद त्यांची सत्याने उतरताना,पाहिले मी कैकदा

देती भाषणे जे ओरडुन ओरडुन व्यसनमुक्तीची
गुपचुप हात चोळताना त्यांनाही, पाहिले मी कैकदा

सारेच हे घडताना , पाहिले मी कैकदाही
तरी काहीच का न बोललो, अद्याप मी एकदाही

*प्रश्न* हा इथे रोजच मनात माझ्या घोळताना
राञ आताशा सरते माझी नुसतेच लोळताना

*✍शशि...........*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

No comments: