Saturday, December 31, 2016

दारे

*💥****** दारे *****💥

उसवली जिंदगानी
कसे लावू धागे दोरे ।
रातंदिन रानामंधी
बाप धरतुया दारे ॥

दारे धरता धरता
बाप ओढतोया बीडी ।
त्याच्या डोळ्यात सपान
त्यात दिसतीया गाडी ।

गाडी भरलेली गचं
धनधान्याच्या पोत्यानी ।
केली किरिपा देवानी
धरतीच्या रे पित्यानी ॥

एक साल बरं मग
चालु राह्यते कहर ।
आली कधी येळ तर
घ्याया लागते जहर ॥

बापा त्वह्या नशीबी रे
सुख थोडं दुखः लई ।
मांडु किती रे कागदी
सारं काळजात हाई ॥

भल्या पहाटेला कसे
बघ झोंबती रे वारे ।
त्या झोंबत्या वार्यातबी
तु धरतुस रे दारे ..... ॥

तुह्या कष्टाची गोष्ट म्या
कागदावरी मांडतो ।
भरलेला कागद ह्यो
सार्या जगाला भांडतो ॥

तुह्या लेकाच्या काळात
जुळतील धागे - दोरे ।
तवरोख मह्या बापा
तुह्या नशीबी हे दारे ॥

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

No comments: