Tuesday, December 27, 2016

मायची दिवाळी

*🌟मायची दिवाळी...🌟*

दर दिवाळीला माय
गोष्ट एकच सांगते ।
राज्य येवो रे बळीच
दान इतुकं मागते ॥

दर दिवाळीला माय
दिवे लावती अंगणी ।
होवो उजेड घरात
इच्छा हिच तिच्या मनी ॥

दर दिवाळीला माय
करी खायास साजुक ।
झाली मोठाली लेकरे
तिला वाटती नाजुक ॥

दर दिवाळीला माय
अशी राबती राबती ।
दिव्यासारखी ती तर
रोज जळती जळती ॥

अशी मायची दिवाळी
जातो दिसं तो सरुन ।
माय नव्याने लढते
सारा अंधार सारुन ॥

*✍शशि......*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

No comments: