Tuesday, December 27, 2016

दिवाळीचाबाजार

*💥दिवाळीचा बजार ......💥*

पोरांना तर्हातर्हाचे कपडे घेऊन
पोरीसाठी नव्या थाटणीचा
नवा चुडीदार घेऊन
स्वतः तोच सदरा सावरुन
बायकोसाठी लुगडं पाहाव म्हणुन
तो शिरला दुकानात
तसं त्याच्या ध्यानात आलं
खिशा केंव्हाच रिकामा झाला होता
सोयाबीनच्या चार पोत्यात
म्हातारीची औषधं, लेकरांचे कपडे
अन् किराणा तेवढाच आला होता

आता फक्त खिशात मालाची पावती
त्यानं दोनदा हात घातला
पण हाताला काहिच नाहि लागल
तो अस्वस्थ झाला   .....

औदा कधीच्या नवत
घ्यायची होती बायकोला साडी
पण तेही काही जमलं नाही
तो तसाच फिरला परत
घेऊ कधीतरी म्हणत
नजरेनच शोधु लागला गाडी
आतल्या आगीने आपोआपच
पेटली त्याच्या हातातली बीडी

धुर सोडत स्वप्न दुर जाताना
कसं वाटतं त्यालाही कळालं नाही
सारा दिस तो नुसता बेजार झाला
बाकी शुन्य अन् खर्च हजार झाला
असा त्याचा दिवाळीचा बजार झाला .......

*✒️शशि......*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

No comments: