Tuesday, December 27, 2016

२६/११

*२६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या सर्व वीर जवानांना विनम्र अभिवादन...*
*त्यांच्या पावन स्मृतिस माझी ही रचना सादर अर्पण....👇👇*

जागे होते आमचे देशप्रेम
जरा कुठे झाला हल्ला
आली एखादी बातमी
सिमेवरच्या गोळीबाराची
किंवा उजाडली पहाट
स्वातंत्र्यदिनाची , गणतंञदिनाची
कारगिलदिनाची , शहिददिनाची.....

बाकी आम्ही शांतच असतो
अगदी मजेत निवांत असतो
आरामात बसुन खात असतो
आठवत नाही जवान
राहत नाही ध्यान....

तेवढ्या पुरते देशप्रेमाचे गाणे
मग नुसते गार्हाणे ......
कसकसले बहाणे.....
देत बसतात शहाणे.....

गेंड्याची कातडी घालुन
नुसत्या गप्पा ठोकल्या जातात..
मग नको नको त्या गोष्टी
बसल्या जागी ओकल्या जातात .....

जर बदलणार नसु आपणच
तर कित्येक तुकाराम
असेच शहिद होत राहतील..
कसाबसारखी पिलावळ
पुन्हा पुन्हा येत राहतील..

होत राहील पुन्हा पुन्हा
राजरोस हल्ला...
विनाकारण पेटतील दंगली
जळतील वत्त्या अन्
पेटेल माझा मोहल्ला...

आग घराजवळ येण्यागदोर
आपण जागे झाले पाहिजे ....
आतंकवादाशी लढण्या इथे
जवानांच्या मागे उभे राहिले पाहिजे........

नापाक पाकड्यांचा आता
उतरवलाच पाहिजे माज....
म्हणजे दिवसाढवळ्या पुन्हा
जळणार नाही ताज.....

*✒️शशि........*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

No comments: