जपुन ठेवावं असं बुक~ स्लॅमबुक ....
काल स्लॅमबुक हा मराठी चिञपट पाहिला. खुपच उत्कृष्ट असे कथानक ... अल्लड वयातलं अल्लड प्रेम अन् त्या प्रेमाचे अनेक किस्से .... वस्तीत नव्याने राहायला आल्याला अपर्णाशी ह्रदयचे भाव जुळणं... तिचा त्याचा मिञ म्हणुन स्वीकार करणं..पण ह्रदयला माञ या पलिकडची अनुभति येत असते .... म्हणुन तो नेहमीचा तिच्याशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो .. त्यासाठी तिच्या छोट्या भावाशी मैञी करणं.. तिच्या आईची कामं करणं... वडिलांशी जवळीक साधणं... हे सारं त्याचं चालु असतं.. अन् या सार्यात त्याला पाठींबा असतो तो त्याच्या आजोबांचा .... आपणही या वयातुन गेलेलो आहोत त्यामुळे आपण नाहीतर कोण या पोरांना साथ देणारं अशा स्पष्ट मताचे ते आजोबा पाहिल्यावर वाटतं... खरच असे आजोबा मिळाले तर ...
प्रेम म्हणजे काय प्रेम काय असतं.. हे सारं सांगताना आजोबान सांगितले ते वाक्य.. " ह्रदय आपण कोणाशी प्रेम करावं एवढच आपल्या हातात असतं .. बाकी कुणी आपल्यावर प्रेम करावं हे आपण नाही ठरवु शकत ..." कायमच लक्षात राहुन जातं....ह्रदयाच्या जास्त संपर्कात आल्यानं आता अपर्णालाही आता त्याच्या सहवासात वेगळी अनुभूति यायला लागते ... पण ती काही क्षणापुरतीच... अन् अचानक एके दिवशी तिला आपल्या मनातलं सांगण्यासाठी तो तिला बोलावतो पण तिच्या वडिलांना कळल्यानं अन् मध्येच सुशील नावाच्या तिच्या वर्गमिञान निर्माण केलेल्या गैरसमजामुळे त्यांच्या मनात ह्रदयविषयी वाईट भावना निर्माण होते .अन् हेच सारं कारणीभुत ठरतं पुढच्या विचिञ प्रवासाला ... सारा पसारा पांगुन बसतो ... सारे ह्रदयशी दुर दुर व्हायला लागतात... अन् ह्रदय कोलमडुन पडतो... त्यामुळे त्याचाच परिमाण त्याच्या अभ्यासावर होतो त्याचा निकाल खराब लागतो .. मग त्याचा मामा त्याला समजावुन सांगतो की ह्रदय या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस ... आपलं करियर घडवं... त्यातुन तो पुढे सावरतोही पण तिची साथ माञ कायमची सुटते ते बिर्हाड ती काॅलनी सोडून जाते तेंव्हा तो तिला फक्त एवढच सांगतो, " अपर्णा, तुला माझ्यावर प्रेम होईल नाही होईल माहित नाही .. पण माझ्या प्रेमाला माञ खोट ठरवु नकोस ... आणि तुझ्या माझ्यापेक्षाही प्रेम ही भावना महत्वाची आहे .. लोकांचा त्यावरला विश्वास नको उठायला..". सतरा वर्षाच्या पोराचे ते शब्द क्षणभर क होईना प्रेक्षकांचा कंठ दाटुन आणण्यात यशस्वी होतात.
पण या सार्यानंतरही ति असं का वागली असेल.. नेमकं काय घडलं हा प्रश्न त्यासाठी निरुत्तरीतच राहतो ... तेंव्हा त्याचे आजोबा सांगतात, ' ह्रदय, पुन्हा कधी तिला भेटलास तर ह्या प्रश्नाच उत्तर माञ तिला नक्की माग.. कदाचित तेंव्हा तुला योग्य उत्तर मिळेल...
नंतर तब्बल पंधरा वर्षांनी होणारी त्याची तिच्याशी भेट अन् तेंव्हा ही त्याचा प्रश्न निरुत्तरीतच राहणं.. हे सारं मन व्याकुळ करणारं उत्तम कथानक साकारल आहे ... शेवटी काय तर प्रेम ही फक्त देण्याचीच गोष्ट आहे तिथं घेण्याचा संबंधच नसतो...
एकुणच काय तर दर्जेदार कथानक, आवश्यक तिवढाच विनोद, स्मृति मराठेंच मोरया गाणं , आजोबांचा अभिनय ह्या चिञपटाच्या जमेच्या बाजु आहेत ...त्यानं तिला लिहायला दिलेलं स्लॅमबुक तिनं दोनवर्षातही रिकामच ठेवलं होतं.. तसाच त्याच्या ह्रदयाचा एक कोपराही तिच्या प्रेमासाठी कायम रिकामाच राहिला....
असे हे स्लॅमबुक प्रत्येकाने वाचावेच म्हणजे पहावे असेच आहे....
तेंव्हा प्रेमात पडलेल्या, प्रेमात पडणार्या अन् प्रेमाविषयी तिरस्कार असणार्या सर्वांनी आवर्जुन पहावा असाच झालाय चिञपट......
प्रेमाविषयीचा आदर अन् केवळं गैरसमजामुळे दुरावणारी नाती, तसेच ऎकुन न घेतल्यामुळे होणारा प्रेमभंग, ह्या सार्या गोष्टी उत्तम पद्धतिन दाखवण्यात आल्या आहेत.....
✍शशि..( नजरे आडच पाहताना ...)
No comments:
Post a Comment