Saturday, December 31, 2016

दारे

*💥****** दारे *****💥

उसवली जिंदगानी
कसे लावू धागे दोरे ।
रातंदिन रानामंधी
बाप धरतुया दारे ॥

दारे धरता धरता
बाप ओढतोया बीडी ।
त्याच्या डोळ्यात सपान
त्यात दिसतीया गाडी ।

गाडी भरलेली गचं
धनधान्याच्या पोत्यानी ।
केली किरिपा देवानी
धरतीच्या रे पित्यानी ॥

एक साल बरं मग
चालु राह्यते कहर ।
आली कधी येळ तर
घ्याया लागते जहर ॥

बापा त्वह्या नशीबी रे
सुख थोडं दुखः लई ।
मांडु किती रे कागदी
सारं काळजात हाई ॥

भल्या पहाटेला कसे
बघ झोंबती रे वारे ।
त्या झोंबत्या वार्यातबी
तु धरतुस रे दारे ..... ॥

तुह्या कष्टाची गोष्ट म्या
कागदावरी मांडतो ।
भरलेला कागद ह्यो
सार्या जगाला भांडतो ॥

तुह्या लेकाच्या काळात
जुळतील धागे - दोरे ।
तवरोख मह्या बापा
तुह्या नशीबी हे दारे ॥

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

Tuesday, December 27, 2016

मायची दिवाळी

*🌟मायची दिवाळी...🌟*

दर दिवाळीला माय
गोष्ट एकच सांगते ।
राज्य येवो रे बळीच
दान इतुकं मागते ॥

दर दिवाळीला माय
दिवे लावती अंगणी ।
होवो उजेड घरात
इच्छा हिच तिच्या मनी ॥

दर दिवाळीला माय
करी खायास साजुक ।
झाली मोठाली लेकरे
तिला वाटती नाजुक ॥

दर दिवाळीला माय
अशी राबती राबती ।
दिव्यासारखी ती तर
रोज जळती जळती ॥

अशी मायची दिवाळी
जातो दिसं तो सरुन ।
माय नव्याने लढते
सारा अंधार सारुन ॥

*✍शशि......*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

प्रश्न

*💥💥 प्रश्न...💥💥*

वेदनेला विव्हळताना पाहिले मी कैकदा
अश्रुंना अश्रुशी बोलताना, पाहिले मी कैकदा

आम्हा न फरक पडतो कशानेही सांगती जे ओरडुन
दुःख त्यांनाच जादा सलताना,
पाहिले मी कैकदा

खेळ ज्यांचा चाले काट्यांशी बिनदिक्कत
फुलांनी त्यांनाही टोचताना, पाहिले मी कैकदा

नाचती धुंदीत जे दुःखाच्या बेधुंदपणे
धुंद त्यांची सत्याने उतरताना,पाहिले मी कैकदा

देती भाषणे जे ओरडुन ओरडुन व्यसनमुक्तीची
गुपचुप हात चोळताना त्यांनाही, पाहिले मी कैकदा

सारेच हे घडताना , पाहिले मी कैकदाही
तरी काहीच का न बोललो, अद्याप मी एकदाही

*प्रश्न* हा इथे रोजच मनात माझ्या घोळताना
राञ आताशा सरते माझी नुसतेच लोळताना

*✍शशि...........*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

रंग

*🎨 रंग .....🎨*

किती विखुरलेत रंग
अगदी बेरंग वाटतेय जिंदगानी
लाख वेळा प्रयत्न केला
तरी ओठी येतेच तुझी गाणी ॥

रंगारंगात रंगलो तरी
मज मी बेरंग भासतो ।
दुःख सारे गिळुन इथे
मी हल्ली रोजच हासतो ॥

ऎकलय मी ,
रंगाने कागदेही बोलु लागतात ।
मनातले साचलेले,
मग तेही खोलु लागतात ॥

पण कागदावरले कळावे एवढे
 सारेच कुठे शहाणे असतात ।
मी माझे शब्दात मांडतो,
कुणी रंगात न्हाऊन निघतो
पण हे सारे व्यक्त होण्याचेच बहाणे असतात .....

म्हणुन आता तरी,
चढावेत जिंदगीला या रंग ।
संपावी माझी माझ्याशी जंग
म्हणजे होता येईल मलाही दंग ॥
इथल्या सार्यांतच.........

*✍शशि...( रंग न्याहाळताना.)*
*९१३०६२०८३४*

असही जगुन पहावं

*💥असही जगुन पहावं...💥*

कधी कधी असंही जगुन पहावं
वाटलच कधी हसावं,
 खळखळुन हसावं
आलाच ऊर भरुन तर,
रडुन मोकळं व्हावं
लोक काय म्हणतील
कशास उगा भ्यायच
उगाच कशाला नको ते
कशाच टेंशन घ्यायच
वाटतं मनाला तेच करावं
कधी तरी सारं विसरुन
स्वतःसाठीच जगावं...
जगता जगता स्वतःसाठी
जमलच तर लोकांसाठी जगावं

कागदावरच्या गांधीपुरतच
किती जपायचं गांधीला
कधीतरी गांधीविचाराला
 जगुनही पहावं.....
कधीतरी असही जगुन पहावं
आपल्याच मस्तीत न्हाऊन निघावं ....
आवडलं त्याला लाइक करुन पहावं
अन् पटलच तर नावासहित
 शेअरही करुन पहावं
कधीतरी असही जगुन पहावं
नेहमीच नाही जमलं तरी
कधीतरी असही जगुन पहावं...

*जगणं खरच सुंदर वाटेल.....*

*✒️शशि....*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

दिवाळीचाबाजार

*💥दिवाळीचा बजार ......💥*

पोरांना तर्हातर्हाचे कपडे घेऊन
पोरीसाठी नव्या थाटणीचा
नवा चुडीदार घेऊन
स्वतः तोच सदरा सावरुन
बायकोसाठी लुगडं पाहाव म्हणुन
तो शिरला दुकानात
तसं त्याच्या ध्यानात आलं
खिशा केंव्हाच रिकामा झाला होता
सोयाबीनच्या चार पोत्यात
म्हातारीची औषधं, लेकरांचे कपडे
अन् किराणा तेवढाच आला होता

आता फक्त खिशात मालाची पावती
त्यानं दोनदा हात घातला
पण हाताला काहिच नाहि लागल
तो अस्वस्थ झाला   .....

औदा कधीच्या नवत
घ्यायची होती बायकोला साडी
पण तेही काही जमलं नाही
तो तसाच फिरला परत
घेऊ कधीतरी म्हणत
नजरेनच शोधु लागला गाडी
आतल्या आगीने आपोआपच
पेटली त्याच्या हातातली बीडी

धुर सोडत स्वप्न दुर जाताना
कसं वाटतं त्यालाही कळालं नाही
सारा दिस तो नुसता बेजार झाला
बाकी शुन्य अन् खर्च हजार झाला
असा त्याचा दिवाळीचा बजार झाला .......

*✒️शशि......*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

मेरा शब्द

*📋 मेरा शब्द...📋*

मेरा शब्द कह रहा है मुझसे
तु सचमे कितना मुर्ख है ।
लोग बातोंको टाल देते है
तुझे भला बुरा बोल देते है ॥

तु हस के भुल जाता है ।
जरासी हसी से खुल जाता है ॥

मै चुप रहा, कुछ न कह सका
लेकिन फिर सोचा, चलो जो हुँ अच्छा हुँ ।
बस दुनियादारीमे अभी बच्चा हुँ
लेकिन गर्व है की सच्चा हुँ ॥

वैसे भी लोग तो फायदा उठायेंगे ही
अगर बिखरा कभी तो यही मुझे जुटायेंगे भी .....

बस इसी उम्मीद पे मै
शब्दोसे लोग जोड लेता हुँ ।
लोगोंकी नफरत को
प्यार मे मोड देता हुँ ॥

शायद आज नही तो कल
समज जायेंगे वो भी मुझे ।
फिर मेरी सोच पे ये शब्द
सोचनाही पडेगा तुझे ..॥

*✍शशि...( शब्दोंको समझाते हुये ....)*

मनापासुन जगावं

*माणसानं मनापासुन जगावं*

*काही आवडलच तर*
 *मनापासुन दाद द्यावी ।*
*कुणी दुःखात असल्यास*
 *मनापासून साथ द्यावी ॥*

*वाटलच हसावं तर*
*खळखळुन हसावं ।*
*दाटला कधी ऊर तर*
*मनमोकळपणानं रडावं ॥*

*कोण काय म्हणतील*
*कशास विचार करावा ।*
*प्रत्येक क्षण आपुला*
*आपुल्या परीन जगावा ॥*

*मनातलं कधीतरी*
*ओठावर आणुन बघावं ।*
*माणसान एकदा तरी*
*मनापासून जगावं ॥*

*✍शशि....( मनातलं मांडताना ....)*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*
*Share If U Agree....*

ओवाळणी

*💥💥 ओवाळणी..💥💥*

ती तिष्ठत दारात उभी होती
कधी येतो माझा दादा
येईल की बाच्या सरणात
जाळला त्यान बा ला दिलेला वादा
बा गेला त्यादिसापासन त्यान
कायमची जवळी केलीय बाटली
म्हणुनच जिवाभावाची बहिण
त्याला आता दुरच वाटली

पण ती माञ वाट पहाते
दर भाऊबीजेला
कदाचित चुकुन येईल तो
अन् आज तो आलाही
चुकुन चुकला तो रस्ता
कदाचित आठवल्या असतील
बहिणीने खाललेल्या खस्ता

तो माञ झिंगलेलाच
बहिणीनं सारं विसरून
आनंदान त्याला घेतलं घरात
छान बसायला पाट
त्यावर भाऊरायाचा थाट
अन् केली ओवाळणी
त्याचा ऊरही भरलेला

खिशात हात घातला तसा
तिनं रोखल त्याला
म्हणाली दादा,
एकच मागते , देशील...?
हे व्यसन सोडण्याची
एकदा शपथ घेशील
वहिणीची कटकट,
लेकरांची फरफट
सारच बंद होईल ...
ऎकशिल ना....

बर्याच दिसाचे दाटलेले
तिनेही सारे खोलले
ऎकुन त्याचेही पाणावलेले डोळे
तिच्याशी बोलले
तसं खिशातली चपटी त्याची
तिथच फुटली
 बहिणीलाही ह्या लाखमोलाची
ओवाळणी भेटली ......॥

*✍शशि.....*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

मृगजळ

*💥 मृगजळ.....💥*

FB वरती त्याची हजारो मिञ
व्हॅटस अप वरती जोडलेत त्यान
शेकडो च्या वरती ग्रुप
हाइक , इंस्टाग्राम आणखीही कशाकशावर
त्याच्याभोवती त्यानं जोडलेत कित्येक मिञ
मिळतात लाखो लाईक
यानं टाकताच एखादं चिञ

वाढदिवसाला पडतो शुभेच्छांचा पाऊस
मॅसेजवरतीच चालते सारी विचारपुस
हाय बाय करण्यातच जातो सारा दिस
मग घरात आवाज वाढतो,
चालु होते घरच्यांची घासघीस

मॅसेज पाहुन उगाच हसतो
असुन ही तो कुणाच्याच सोबत नसतो
काही बाही बडबडत असतो
नुसता सोशल मीडिया साठी धडपडत असतो
आता आता तर हा
फारच चिञविचिञ वागतोय
हल्ली तर राञ राञ जागतोय

घरच्यांनी गाठला दवाखाना पाहण्यासाठी
हा झाला तर नसेल ना सायको
आत जेंव्हा तपासत होता डाॅक्टर
बाहेर तिष्ठत होते पोर, बाप अन बायको

बाहेर आल्यावर बोललो त्याला
कशाला हवेत लाख ते तसले मिञ
बघ कोण इथं काय आहे चिञ
कशाला तो मीडिया उगाच सारे व्यर्थ
आपली माणसं सांभाळ
त्यांच्या मुळेच आहे जगण्याला अर्थ

एवढा सारा उपदेश पाजुन
मी तिथुन निघालो, जरा दुर जाताच माझाच फोन वाजला
एक नवीन संदेश असं काहितरी म्हणला

खिशाकडे हात वळताच,
माझा मीच थांबवला
माझाच उपदेश मला आठवला ...
इतके कसे आपण या सार्यांत गुरफटलो
माझा मी मनाशीच पुटपुटलो....

तुला काय मला काय
सांग मिञा कधी हे कळणार
किती दिवस आपण
मृगजळाच्याच पाठी पळणार .........

*✍शशि.......🙊*
*९१३०६२०८३४*

असच काहीतरी

माणुस उगाच मृत्युला नाव ठेवतो.त्यापेक्षा जास्त ञास तर जीवन देते.पण माणुस खरच विचिञ प्राणी आहे, टोचणार्या काट्यांपेक्षा बोचणारी फुलं त्याला वाईट वाटतात.

आयुष्यात कोणी नसल्याच दुःख जास्त वाटत नाही. पण अचानक कोणी यावं आणि स्वप्नागत दुर जावं हे त्याला कधीच सहन होत नाही. म्हणुन आयुष्यात एकदा आपल्या जवळ आलेली माणसं दुरावणार नाहित याची जास्त काळजी घ्यायला हवी. कारण नाती तुटताना आवाज होत नाही पण सारं मन बधिर होतं अन् मग धीर मिळावा तरी कसा.

पण यासार्या बरोबरच यातनेचे कितीही डंख बसले तरी पुन्हा पंख पसरवून तो आयुष्याला रंग देण्यासाठी भंग पावलेल्या स्वप्नांच्या तुकड्यावरुन उठुन शोधु लागतो नवा संग अन् घेतो भरारी जसा उंच उडावा एखादा विहंग. आणि हो असच तर जगावं सार्यांनीच नाहीतर फक्त देहात श्वासोच्छावास करण्याच माध्यम बनुन राहण्यात कुठली आलीय मजा.

#असच काहितरी...
#शशिच्या मनातलं.....

✍शशि..

अंगाई

*लिंबोणीच्या झाडामागे*
*आता चंद्र लपत नाही ।*
*म्हणुनच आता बाळही*
*लवकर झोपत नाही ॥*

*हरवली लिंबोणी ती*
*चंद्र कुठे आता लपणार ।*
*डिजे ऎकणारे पाडस*
*अंगाईने कसे झोपणार ॥*

*✍शशि........*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

पानगळ

*🍂🍂 पानगळ...🍂🍂*

पानांची पानगळ पाहताना
सहज पडतो प्रश्न मला
काळ खरच कसा निघुन जातो
बघता बघता ऋतु बदलतात
ऋतु सोबत वारे बदलतात
अन् एकदा का वारे बदलले की मग सारेच बदलतात
आपल्याच फांद्या मग आपल्यालाच दुर लोटतात
मनात मग नुसते उमाळे दाटतात

पण हसत हसत सारे स्विकारायचे असते
एकदा वेळ झाली की
आपले आपणच निघायचे असते

ना कसला खेद ना कुठली इर्षा
आपण उगवणारच नव्याने मातीतुन
फक्त पडावी एकदा मनाजोगी वर्षा.....
म्हणुनच तर वाटत नाही दुःख
त्या गळणार्या पानांनाही
कारण नव्यांच्या स्वागतासाठी
एवढा तर करावाच लागेल त्याग ......
तो तर आहे जगण्याचाच भाग

*✍शशि.......*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

इतिहास

*🌹.......इतिहास ......🌹*

काल अचानक दिसलीस
उभी होतीस रांगेत ।
अशीच ताडकळत थांबायचीय
कधीकाळी माझ्यासाठी बागेत ॥

तासनतास उभी राहायचीस
पहात बसायचीस माझी वाट ।
मी दिसलो की मग उगाच
फिरवायचीस माझ्याकडे पाठ ॥

तुझं थांबण माझ उशिर करणं
रोजच घडायच सारं ।
मग अलगद बिलगायचीस
सुटल जरा का वारं...॥

तुझ्या त्या स्पर्शाने सये
मी सारा शहारुन जायचो ।
रागावलेल्या तुझ्या डोळ्यांकडे
मग हसुन नुसता पाहायचो ॥

एकदा का नजरा नजर झाली
सार विसरुन जायचीस ।
माझ्या लाचार नजरेमध्ये
स्वःतला शोधत राहायचीस ॥

एकेदिवशी अचानक मग
आपण सये दुरावलो ।
एकमेकांच्या फक्त
आठवणीतच राहिलो ॥

ना पुढे भेट ना कधी गाठ
जातायेता नुसती पहायचो बाग ।
तु नाही दिसायचीस कुठे
मग उठायची काळजात आग ॥

हळुहळु सारेच ,
विसरली असशील तु ।
पण मी माञ वाहतो आहे
खांदी तुझ्या आठवांचे जु ॥

आज इथे दिसलीस म्हणुन
आठवला सारा इतिहास ।
इथल्या समाजाने दिलेला
आपल्या प्रेमाला फास ॥

खरच इतक्या सहजासहजी
नाही विसरता येत इतिहास ।
असो कुणासोबत घावलेला तास
किंवा कुणी भरवलेला घास ॥
----------------------------------------

*✍शशि.......*
*📞 ९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*
*@Copyright .....*

माझीकविता

तुला उगवणारं बीज कळतं... बीजापायी झालेले मातीच चीज कळतं...तुला फुलणारं फुल कळतं...मातीमधल्या मुळांच कुळही कळतं... तुला उमलणारी कळी कळते ... निसर्गाच सौंदर्य कळी स्थळी सारच कळतं... मग कशी म्हणतेस माझी कविता कळत नाही ... याहुन का वेगळी आहे ती....

*✍शशि....*
*( बोररांजणी, जि.जालना )*
*📞 ९१३०६२०८३४*

असच काहितरी

आयुष्य सारेच जगतात अन् मरतातही सारेच पण जी माणसं लोकांच्या मनात घर करतात ती माणसं मातीत मिसळली तरी कायम स्मृतित राहतात...

ज्या माणसांचा आयुष्याचा सारा पट फक्त स्वतःसाठी धडपड करण्यातच जातो ती माणसं विस्मृतीतही पटकनच जातात...पण जी माणसं ललाटाबाहेरच खेचुन आणुन आयुष्याच्या लाटांवर स्वार होतात तीच माणसं स्मृतिपटलावर कायमचा ठसा उमटवतात..

*#असच काहितरी ......*
*#शशिच्या मनातले....*

*✍शशि.....*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

वेदनेचमहाकाव्य

*💥बापाच्या वेदनेच महाकाव्य..💥*

*बापा,*
तु सहत गेलास वेदना
रानोमाळच्या ढेकळांवर
कितींदा केलास तु अभिषेक रक्ताचा
खचला नाहीस बसला नाहीस
हाकत राहिलास आडव्या उभ्या रेघाड्या
लोकांच्या चढल्यात माड्यावर माड्या
पण तुझ्या दावणीला अजनुही
दारी उभ्या बैलगाड्या .......

*बापा,*
तु सहन केलास
सळसळत हेलकावणारा वारा
सारं क्षणात उध्वस्त करणार्या गारा
माथ्यावर आगीचा डोंब घेउन
झेललास सारा पारा
तरी नशिबाचा अजुन
चालुच आहे मारा........

इतकं कसं रे सहन करतोस
उभ्या उसासारखा तु
आता चिपाटागत दिसतोस
सारा काळवंडलाय चेहरा
कपाळावरल्या घामाने
पुसल्या का तुझ्या नशिबाच्या रेषा....?
का नव्हत्याच तिथे कुठल्या रेषा....?
नाहीतर तुझ्या नशिबीही
आले नसते एवढे भोग..
अन् यावर कविता करण्याचेही योग...

तुझी हिच वेदना ...
धावते आहे माझ्या नसानसातुन
कारण मी पाहिलच नाही ऎकलच नाही ...
तर जगलोय तुझ्या वेदनेचं
महाकाव्य
तुझ्या हातात हात घालुन
म्हणुन आता हिच वेदना
उतरते माझ्याही शब्दांत
कळवळतात शब्दही
जाणवतो त्यांनाही जाळ
उभा राहतो नव्याने सारा जुना काळ...

पण एकच खंत आहे...
सांग बापा कधी तुझ्या वेदनेला अंत आहे...
नुसते दिसतच नाही रानोमाळी
तर पिकांच्या सळसळीतही
श्राव्य आहे तुझं महाकाव्य
त्यापुढे थिटंच आहे माझं काव्य ......

*✍शशिकांत मा. बाबर*
*( युवाव्याख्याते, जालना )*
*९१३०६२०७३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

आधुनिक कणा

*💥आधुनिक कणा....💥*
( कविवर्य कुसुमाग्रजांची माफी मागुन......)

ओळखलत का बाई मला, एवढ्या थंडीत आला कोणी ।
स्वेटर होते घातलेले, गारठलेली वाणी ॥

क्षणभर बसला, नंतर हसला , बोलला वरती पाहुन ।
File लई पाहु नका आत मध्ये खोलुन ॥

पुर्वजन्मीचे कोणते हे वैर , ठेवले submission वाढून ।
एवढ्या सकाळी उठुन आलोय, साखर झोप गाडून ॥

निशा सरली, नशा उतरली सारी night मारली ।
तरी बाई अजुनही, एक assignment राहिली ॥

मिञासोबत बसुन , तेवढी एक छापतो आहे ।
राहिलं साहिलं सारं, एवढ्या थंडीत लिहितो आहे ॥

फाईलकडे हात जाताच, हसत हसत बोलला ।
चेक करा index फक्त , oral नको म्हणला ॥

कंबर वाकली लिहुन लिहुन, वाकला पहा कणा ।
पाठीवरती हात ठेवुन , बाई फक्त मार्क देते म्हणा ॥
........... फक्त मार्क देते म्हणा ॥

*✍शशि.....*
*📞९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

भेगा

*💥भेगा.........💥*

पायाला पडलेल्या भेगा पाहुन
माय आठवलीस तु...
अशाच कित्येक भेगा पडल्यात
तुझ्याही पायाला .....

पण म्हणुन तुला थोडच भेटतं
आरामात राहायला...
तुला ओढावाच लागतो गाडा .....
गोठवणार्या थंडीतही जागी होतेस तु
उठण्या अगोदर सारा वाडा ....

तु झाकत राहतेस सार्या भेगा
कारण तुझ्या नशिबी नाहित
आयत्या पिठावर मारणं रेघा ....
म्हणुन तु बुजवत राहतेस सारं...
कधी पायाच्या तर कधी जिंदगीच्या
पडल्यात ज्या भेगा.....

*✍शशि....*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

आई

*आई.......*

आईच्या उदरात उगवते
संस्काराचे बीज.....।
हेच बीज बहरत जाता
होते आयुष्याचे चीज ...॥

आईच्या पदरात पसरते
इवलेसे हे रोप...।
ह्या रोपाला रडतानाही
पदरातच लागते झोप..॥

आईच्या कुशीत कळते
जगण्याचे सारे ज्ञान..।
मायेची ती ऊब मिळता
लागते झोपही छान ...॥

आजही येता कुशीत तुझ्या
आई होतो बघ मी बाळ ।
जरी झालोय थोडा मोठा
अन् लोटलाय बराच काळ..॥

आई तुझी माया मला
आजन्म अशीच मिळत राहो..।
सुख सारे तुला मिळो
दुःख तुझे मी गिळत राहो..॥

*✍शशि.....( आई आठवताना...)*
*📞९१३०६२०८३४*

२६/११

*२६/११ च्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेल्या सर्व वीर जवानांना विनम्र अभिवादन...*
*त्यांच्या पावन स्मृतिस माझी ही रचना सादर अर्पण....👇👇*

जागे होते आमचे देशप्रेम
जरा कुठे झाला हल्ला
आली एखादी बातमी
सिमेवरच्या गोळीबाराची
किंवा उजाडली पहाट
स्वातंत्र्यदिनाची , गणतंञदिनाची
कारगिलदिनाची , शहिददिनाची.....

बाकी आम्ही शांतच असतो
अगदी मजेत निवांत असतो
आरामात बसुन खात असतो
आठवत नाही जवान
राहत नाही ध्यान....

तेवढ्या पुरते देशप्रेमाचे गाणे
मग नुसते गार्हाणे ......
कसकसले बहाणे.....
देत बसतात शहाणे.....

गेंड्याची कातडी घालुन
नुसत्या गप्पा ठोकल्या जातात..
मग नको नको त्या गोष्टी
बसल्या जागी ओकल्या जातात .....

जर बदलणार नसु आपणच
तर कित्येक तुकाराम
असेच शहिद होत राहतील..
कसाबसारखी पिलावळ
पुन्हा पुन्हा येत राहतील..

होत राहील पुन्हा पुन्हा
राजरोस हल्ला...
विनाकारण पेटतील दंगली
जळतील वत्त्या अन्
पेटेल माझा मोहल्ला...

आग घराजवळ येण्यागदोर
आपण जागे झाले पाहिजे ....
आतंकवादाशी लढण्या इथे
जवानांच्या मागे उभे राहिले पाहिजे........

नापाक पाकड्यांचा आता
उतरवलाच पाहिजे माज....
म्हणजे दिवसाढवळ्या पुन्हा
जळणार नाही ताज.....

*✒️शशि........*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

स्मोकींग झोन

*स्मोकींग झोन...🚬🚬*

राजे तुमच्या फोटोला हार घालताना पाहताना
अभिमानाने भरुन येतो ऊर....।
पण लाज वाटते मग जराशी
जेंव्हा पाहतो त्याच फोटोच्या वरुन वाहणारा सिगारेटचा धूर.....॥

उगाच मिरवतो टिमकी आम्ही
उगाच का नुसता रातंदिन जयघोषाचा सूर...
पण तुमच्या विचारापासुन जातोय थोडा दूर....॥

कधीतरी फोटोमधुन एकदा
राजे तुम्ही बाहेर याच..।
भरकटलेल्या तुमच्या मावळ्यांना
एकदा फैलावर घ्याच...॥

रोका हो सारे हे,
कळतय ना.. की करुन तुम्हालाही फोन....
तेही चालेल मला,
फक्त नष्ट होऊ द्या इथले
स्मोकींग झोन...॥

*✍शशि..( MH19 न्याहाळताना...)*
*९१३०६२०८३४*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

रांडझालायसमाज

*💥रांड झालाय समाज....💥*

नको नको ते दाखवत
सारं उघडं करु लागलाय समाज..
उगाच मोठमोठ्या गप्पा करत
आपलाच दिडशहाणपणा नागडा करु लागलाय समाज....

हात वारे करुन मीच लई भारी
जो तो पटवुन देतो आहे...
खोटेही ओरडुन ओरडुन
खरे असल्याचे दाखवुन देतो आहे

अस्सल खोटे बोलतानाहि
ओठ यांचा दाताखाली जात नाही..
दुसर्याच्या घरात दिवा लावतो
आपल्या बुडाखालचा अंधार कुणी पाहत नाही...

मदमस्त रंगेल जगण्याचे अप्रुप नुसते
कपाळी टिळा लावुन
टाळ कुणी धरत नाही...
जो तो भांबावलेला
हाती माळ कुणी धरत नाही...

ओठावरची लाली
मदमस्त चाली...
तुझ्यासारखेच हास्य गाली..
रोजच नव्याचे कुंकु भाळी...
सारं काही खोटं खोटं..
खर करुन दावु लागलाय समाज..

दिसता बाई...
सुटते खाज...
चढतो माज..
गुंडाळली लाज..
म्हणुन वाटतय
नुसता सांड झालाय समाज..
खरच बये तुच नाहीतर
रांड झालाय समाज...

*✍शशि....*
*९१३०६२०८३४*

कविता

💥कविता.....💥

कविता म्हणजे
नसते फक्त
मदमस्त चाली
ओठावरची लाली
गालावरची खळी
अन् गुलाबाची कळी......

कविता असते
राबणारी माय काळी
बापाची रात पाळी
छाताडाची जाळी
तुझ्या माझ्या भाळी
कोणत्याही काळी

कविता असते
वास्तवाची गोळी
विस्तवाची होळी
काटेरी ती कळी
राबणारा बळी.....

कविता असते
परिस्थितीचे फटके
नियतीचे झटके
नशिबाचे सटके
अगदीच हटके....

कविता कुठे नसते
सुवासिक अत्तरात
हर प्रश्नाच्या उत्तरात
ती असतेच हर स्थळी
फक्त वेचता आली पाहिजे
अन् वाचता आली पाहिजे ....

✍शशिकांत मा. बाबर
📞९१३०६२०८३४
www.shashichyamanatale.blogspot.com

Sunday, December 25, 2016

इंजीनियरिंगपुराण......

संख्या.. इंजिनियरिंग...गुणवत्ता...

मिञांनो, बर्याच वेळा आपल्याला असं वारंवार ऎकायला मिळतं की हे खुप झालेत ते खुप झालेत ... त्याला काही किंमत राहिली नाही आता कुणीही तेच करतय... कधी काळी डिएड, बीएड च्या बाबतीत ऎकायला भेटायची ही वाक्य पण आता इंजीनियरींगच्या बाबतीत काहिस असच वातावरण आहे ... त्याला कारणही तसच आहे .... भरमसाट इंजीनियरिंग महाविद्यालय, पास झाला तो इंजीनियर होऊ शकतो अशी परिस्थिति इथल्या तथागतित शिक्षणसम्राटांनी करुन सोडलीय.. त्यामुळे उठ सुठ कुणीही इंजीनियरिंगला प्रवेश मिळवतो आहे .. अगदी काहि नाही जमलं तर इंजीनियरिंग तर आहेच .... पप्पाकुठेही आपल्याला प्रवेश मिळवुन देतील.. अशी मुलांची भावना आहे . या सगळ्यामुळे मग एखाद्या हुशार विद्यार्थ्यालाही त्याच गणतित धरले जाते ... कधी कधी तर असा अनुभव येतो की चक्क कुणी काय करतो विचारलं अन् आपण इंजीनियरिंग म्हटलं की पुढचा असा काहि नजर टाकुन पाहतो .. की आपल्या क्षणभर वाटतं साला खरच आपण काही चुकीच तर करत नाही ना..? यातुन आपल्याला जे पाहिजे ते साध्य होईल की नाही...? . पण हे सारं कशामुळे तर केवळ संख्या वाढल्याने ... म्हणजे नुसता संख्यात्मक विकास कुणालाच पटणारा नसतो ते यातुन दिसतं...

पण म्हणजे काही सगळे इंजीनियर हे असेच असतात असही नाही ... असो. काल परवाचा माझा स्वतःचाच अनुभव एका दुरच्या नातेवाईकाने विचारले, काय करतोस..? म्हटलं , इंजीनियरींग.. बिचारा लगेच शांत झाला .. पुढे काही विचारलच नाहि पण त्याचा चेहरा पाहुन मी स्वतःहुन म्हणालो की गव्हर्नमेंट ला आहे ... मग जरा कुठे त्याचा चेहरा बरा झाला... पण तरी तो न राहुन म्हटलाच , लय झाले पहा हे इंजीनियर आता.. जिकडं तिकडं सगळे इंजीनियरच .. मेडिकल वगैरे बगायच की रे .. मनात म्हटलं आता आपण न बोललेच बरं अन् मी हसुन उत्तर टाळल....
तर हे असं इंजीनियरिंग पुराण... बरं या नाव ठेवणारात सारेच काही शिक्षण क्षेञातले महान आत्मे नसतात.. ज्यांना मॅकेनिकल इंजीनियर अन् मॅकेनिक सारखाच वाटतो.. ज्यांना इलेक्ट्रीकल इंजीनियर अन्  वायरमन सारखाच वाटतो.. ज्यांना सिव्हिल इंजीनियर म्हणजे गंवडी वाटतो..ज्यांना कंप्यूटर इंजीनियरिंग म्हणजे MS-CIT वाटते ते महानगही इंजीनियरींगच्या नावने बोंब मारण्यात काहि कसर सोडतं नाहित... तर असो हे असे इंजीनियरिंग पुराण.....

या सार्यांना कारणंही तशीच आहेत... इंजीनियरिंग वर अगदी चिञविचिञ संदेश माध्यमांद्वारे फिरताना दिसतात.. मालिका, सिनेमे यामध्ये दाखवली जाणारी इंजीनियरिंग महाविद्यालये.. हे सारं पाहुन मग लोकांना वाटत सगळीकडे असच चालतं .. त्यामुळे मग इंजीनियरिंगच्या बाबतीत लोकांचे असे मत तयार व्हायला लागते.. मागच्या काहि वर्षांपासुन तर इंजीनियरिंगच्या ५० % जागा रिक्त कुठे ६० % जागा रिक्त अशा बातम्या वारंवार दिसतात अन् मग आपल्या टक्केवारीच्या दुप्पट हजार भरुन ज्याला पाहिजे त्याला प्रवेश घेता येतो .. मग साहजिकच जे एवढं स्वस्त असेल ते लोकांना चांगल कसं वाटेल ..

पण या सार्यामुळे नाउमेद होण्याची मुळीच आवश्यकता नाहि. भलेही आज संख्या वाढली असेल पण गुणवत्ता माञ पाहिजे तेवढीच आहे .. आणि शेवटी कधीच स्कोप किंवा संधी ही एखाद्या कोर्स ला नसते ... ती तुमच्या गुणवत्तेला असते.. तुमच्यात गुणवत्ता असेल तर तुम्हाला कुणीच कमी लेखु शकत नाहि.. मग आजुबाजुला धावणारांची कितीही गर्दी राहो फक्त तुमच्या पायामध्ये ताकद पाहिजे म्हणजे यशाची क्षितिजं तेंव्हाच पादंक्रात करता येतात ... तिथे धावणारे कमी की जास्त याचा विचार करायचा नसतो फक्त आपल्याला आपल्या हिमतीवर पोहचायचय तेवढं ध्यानात ठेवलं की झालं...
शेवटी काय तर संख्या जास्त असली म्हणजे वाघ कमकुवत समजायचा अन् कमी असणारी पिलावळ श्रेष्ठ समजायची हा मुर्ख करण्यात काहिच अर्थ नसतो..... तस तर जगाची लोकसंख्या आज अब्जावधी झालीय मग माणुस म्हणुन आपली किंमत कमी झालीय.. तर नक्कीच नाही .... वाढणार्या संख्येबरोबरच आपलं वेगळं अस्तित्व आपण सिद्ध करायच आहे म्हणुनच तर कदाचित आपला जन्म झाला असेल ... एवढे कित्येक माणसं आहेतच मग काय ... आता माणसं लय झाली हो काही दुसरं बघायच की जन्माला येताना .... असा प्रश्न तर आपण जन्मणार्या बाळांना विचारणार नाही ना......?


✍शशि..( इंजीनियरच्या नजरेतुन पाहताना...)

Saturday, December 24, 2016

बुजगावणे

*💥बुजगावणे...💥*

हे उडत्या पाखरांनो,
जरा जपुन रहा आता
तुम्हाला भिती घालायला , उभी राहतील बुजगावणे
इथे प्रत्येक शेतात ....
इवल्याशा काठीवर गाडग्याच डोकं घेऊन....

पण तुम्ही घाबरु नका मुळीच,
काय खायच ते निवांत खा
खाताना त्या बुजगावण्याकडेही पहा
म्हणजे त्यालाही कळेल,
आता खोट्याला भिण्याचे दिवसं गेलेत इथल्या पक्ष्यांचे ...
अन् अशाच बुजगावण्यांना भिण्याचे इथल्या माणसांचेही....

तेंव्हा गरज असेल तर खरा खुरा होऊन दाखवं
जमलच तुला तर आम्हाला अडवुन दाखवं
दचकावुन सांगा त्याला, पांढर्या सदर्याला नुसताच भीतो तरी कोण..
ते बघ, दाणे खायला दुरुन
आलीत अजुन पाखरं दोन...

म्हणुन हे अशा बुजगावण्यांनो,
आता संपलेत तुमचे दिवसं..
आता आम्हालाही मिळू द्या आमचा वाटा...
अन् जमलच तर आमच्याशी तुमच नव्यानं नवं नातं जोडा .....

*✍शशिकांत मा. बाबर*
*📞९१३०६२०८३४*

आईचा जाॅब

तिन सहज विचारलं," तुझी आई काय करते..' नाही म्हणजे जाॅब वगैरे ....?"

मी हसत उत्तरलो," नाही ती काहीही शिकलेली नाही. हा पण जाॅब माञ करते बरं..."

" न शिकता जाॅब ...? ", तिचा अपेक्षित प्रश्न ....

हो. मला जरा काही लागलं की पदर फाडुन उपचार करते तेंव्हा ती डाॅक्टर असते. जन्माल्यापासुन काय बोलायच एवढच नाहितर कसं बोलायच हे हरघडी शिकवते तेंव्हा ती शिक्षिका असते . सकाळी उठल्यापासुन झोपेपर्यंत सारच अगदी मॅनेज करते तेंव्हा ती घराचा मॅनेजर असते. नव्हे नव्हे सारेच जाॅब ती करत असते अगदी अविरत.... ना कुठली रजा ना कुठला बोनस .... ती चोविस तास काम करत असते ....

हा फक्त फरक एवढाच की हे सर्व ती करते .... पति अन् पोरांसाठी आपुल्याच घरासाठी ..... ना कुठल्या पगारासाठी.....

आता ती शांत झाली होती... कदाचित घराबाहेरचा जाॅब करणार्या आई पेक्षा हि आई तिला भारी वाटली होती...

Great salute to all mothers......

✍शशि....

काहि प्रश्न

प्रत्येक प्रश्नाला उत्तर मिळालच पाहिजे हा धरुच नये हट्टहास ... कारण काही प्रश्न निरुत्तरीतच बरे असतात त्यांची उत्तरं मिळाली की जास्त ञास होतो... म्हणुन तशीच सोडुन द्यायची असतात ती .. जरी असतील कितीही खास... कारणं त्यांच्या उत्तरांमुळे कदाचित केला जाईल आपला उपहास ... अन् मग बेचव लागेल तोंडातला घास.. गदमरु लागेल आपला श्वास .... कदाचित आवळल्या सारखा वाटेल गळ्याभोवती फास ... तु म्हणशील खरच का इतका होतं आतो ञास .....

अनुभव घेऊन बघ... अनुत्तरित प्रश्न सोडवुन बघ... अन् प्रश्नांनी वेढलेले जगणे जग... म्हणजे तुला आपोआप जाणवेल सारी धग...

पण राहुच दे ... तु आपलं मजेत जग... सार्यांच्याच नशिबी थोडाच असतो सारखाच वग... पण जळणारे काळीज अन्  छळणारे प्रश्न येतातच कधी ना की वाट्याला ... म्हणुन आत्ताच सावध करतो...

जर तुलाही कधी पडलाच एखादा प्रश्न तर त्याला तसच सोड ... कारण....

काही प्रश्न निरुत्तरीतच बरे असतात... ते वेळ आल्यावरच सुटतात .. म्हणुन ते तेवढेच खरेही असतात......

✍शशिकांत मा. बाबर
www.shashichyamanatale.blogspot.com

शिवबा.....

शिवबा,
तुम्ही मॅनेजमेंटचे गुरु...
अस काहिस शिकवल जातं परदेशात...
म्हणजे तुम्ही सार्या जगाचेच...
मग आपल्याच देशात तुमच्या वरुन
का होतात वाद सुरु...?
एक भाबडा प्रश्न तुमच्याच वारसदाराचा .....

तुम्ही समुद्री सुरक्षेचे बाप..
सार्या जगाला आहात परिचित
मग तुमच्या नावान अजुनी
का बिष ओकतात काही साप...
एक भाबडा प्रश्न.....

तुम्ही स्वराचे बांधले होतेत तोरण
अगदी कमी वयातच ...
मग तुमचच नाव घेऊन ठरवतात हे
तरी का चुकतात यांची धोरण....
एक भाबडा प्रश्न .......

तुम्ही दुरदृष्टीचे नेते ..
तुमच्या विचारांना दुर ठेवत
फक्त आपलाच स्वार्थ दृष्टीत ठेवला जातो
का......?
एक भाबडा प्रश्न ..........

✍शशि..( उत्तराच्या शोधात..)
९१३०६२०८३४
www.shashichyamanatale.blogspot.com

Monday, December 19, 2016

स्लॅमबुक

जपुन ठेवावं असं बुक~ स्लॅमबुक ....

काल स्लॅमबुक हा मराठी चिञपट पाहिला. खुपच उत्कृष्ट असे कथानक ... अल्लड वयातलं अल्लड प्रेम अन् त्या प्रेमाचे अनेक किस्से ....  वस्तीत नव्याने राहायला आल्याला अपर्णाशी ह्रदयचे भाव जुळणं... तिचा त्याचा मिञ म्हणुन स्वीकार करणं..पण ह्रदयला माञ या पलिकडची अनुभति येत असते .... म्हणुन तो नेहमीचा तिच्याशी संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतो .. त्यासाठी तिच्या छोट्या भावाशी मैञी करणं.. तिच्या आईची कामं करणं... वडिलांशी जवळीक साधणं... हे सारं त्याचं चालु असतं.. अन् या सार्यात त्याला पाठींबा असतो तो त्याच्या आजोबांचा .... आपणही या वयातुन गेलेलो आहोत त्यामुळे आपण नाहीतर कोण या पोरांना साथ देणारं अशा स्पष्ट मताचे ते आजोबा पाहिल्यावर वाटतं... खरच असे आजोबा मिळाले तर ...

प्रेम म्हणजे काय प्रेम काय असतं.. हे सारं सांगताना आजोबान सांगितले ते वाक्य.. " ह्रदय आपण कोणाशी प्रेम करावं एवढच आपल्या हातात असतं .. बाकी कुणी आपल्यावर प्रेम करावं हे आपण नाही ठरवु शकत ..." कायमच लक्षात राहुन जातं....ह्रदयाच्या जास्त संपर्कात आल्यानं आता अपर्णालाही आता त्याच्या सहवासात वेगळी अनुभूति यायला लागते ... पण ती काही क्षणापुरतीच... अन् अचानक एके दिवशी तिला आपल्या मनातलं सांगण्यासाठी तो तिला बोलावतो पण तिच्या वडिलांना कळल्यानं अन् मध्येच सुशील नावाच्या तिच्या वर्गमिञान निर्माण केलेल्या गैरसमजामुळे त्यांच्या मनात ह्रदयविषयी वाईट भावना निर्माण होते .अन् हेच सारं कारणीभुत ठरतं पुढच्या विचिञ प्रवासाला ... सारा पसारा पांगुन बसतो ... सारे ह्रदयशी दुर दुर व्हायला लागतात... अन् ह्रदय कोलमडुन पडतो... त्यामुळे त्याचाच परिमाण त्याच्या अभ्यासावर होतो त्याचा निकाल खराब लागतो .. मग त्याचा मामा त्याला समजावुन सांगतो की ह्रदय या गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस ... आपलं करियर घडवं... त्यातुन तो पुढे सावरतोही पण तिची साथ माञ कायमची सुटते ते बिर्हाड ती काॅलनी सोडून जाते तेंव्हा तो तिला फक्त एवढच सांगतो, " अपर्णा, तुला माझ्यावर प्रेम होईल नाही होईल माहित नाही .. पण माझ्या प्रेमाला माञ खोट ठरवु नकोस ... आणि तुझ्या माझ्यापेक्षाही प्रेम ही भावना महत्वाची आहे .. लोकांचा त्यावरला विश्वास नको उठायला..". सतरा वर्षाच्या पोराचे ते शब्द क्षणभर क होईना प्रेक्षकांचा कंठ दाटुन आणण्यात यशस्वी होतात.

पण या सार्यानंतरही ति असं का वागली असेल.. नेमकं काय घडलं हा प्रश्न त्यासाठी निरुत्तरीतच राहतो ... तेंव्हा त्याचे आजोबा सांगतात, ' ह्रदय, पुन्हा कधी तिला भेटलास तर ह्या प्रश्नाच उत्तर माञ तिला नक्की माग.. कदाचित तेंव्हा तुला योग्य उत्तर मिळेल...

नंतर तब्बल पंधरा वर्षांनी होणारी त्याची तिच्याशी भेट अन् तेंव्हा ही त्याचा प्रश्न निरुत्तरीतच राहणं.. हे सारं मन व्याकुळ करणारं उत्तम कथानक साकारल आहे ... शेवटी काय तर प्रेम ही फक्त देण्याचीच गोष्ट आहे तिथं घेण्याचा संबंधच नसतो...

एकुणच काय तर दर्जेदार कथानक, आवश्यक तिवढाच विनोद, स्मृति मराठेंच मोरया गाणं , आजोबांचा अभिनय ह्या चिञपटाच्या जमेच्या बाजु आहेत ...त्यानं तिला लिहायला दिलेलं स्लॅमबुक तिनं दोनवर्षातही रिकामच ठेवलं होतं.. तसाच त्याच्या ह्रदयाचा एक कोपराही तिच्या प्रेमासाठी कायम रिकामाच राहिला....

असे हे स्लॅमबुक प्रत्येकाने वाचावेच म्हणजे पहावे असेच आहे....
तेंव्हा प्रेमात पडलेल्या, प्रेमात पडणार्या अन् प्रेमाविषयी तिरस्कार असणार्या सर्वांनी आवर्जुन पहावा असाच झालाय चिञपट......

प्रेमाविषयीचा आदर अन् केवळं गैरसमजामुळे दुरावणारी नाती, तसेच ऎकुन न घेतल्यामुळे होणारा प्रेमभंग, ह्या सार्या गोष्टी उत्तम पद्धतिन दाखवण्यात आल्या आहेत.....


✍शशि..( नजरे आडच पाहताना ...)

Wednesday, December 7, 2016

चलन बदल

💰चलन बदल....💰

काल परवा बापाच्या खिशातल्या नोटा पाहिल्या....
त्याही झाल्यात काळ्या
पण त्या नाही आल्या टेबलाखालुन
वा कुणाच्या पाठीमागुन
त्यासाठी पाठीला गाठीपडस्तोर
राबलाय बाप.....
काळ्या आईला चिरत
टाकत राहिलाय औतामागं धाप...
त्याच सारं अंगच होतं
घामाच्या धारांनी काळंखाप
अन् एकदा का चिटकला तो नोटांना
की होते त्याचीही वाफ

म्हणुन म्हणतो सरकार
माझ्या बा कडं पण
आहे बरं काळा पैसा ....
पण हा नव्हे बरं काही
तुम्ही सांगता तैसा....

आणि हो हाच पैसा ......
जेंव्हा माय ठेवते जपुन
लुगड्याच्या गाठीत
पदराच्या कडेला....
तेंव्हा घामावलेल्या मायच्या कपाळावरल्या कुंकवाचा
त्यालाही मिळतो संग...
अन् मग त्याचाही होतो
लालसर रंग....

बापाच्या पँटीच्या खिशातला काळा पैसा
मायच्या लुगड्यात रंगीत होतो
हाच शे पन्नास रुपड्या
आमच्या जगण्याच संगीत होतो....

असा नोटांचा रंग बदलताना
मी कित्यांदा पाहिलाय...
पण त्याला काय म्हणाव
कधी काही समजलं नाही...
जिंदगीतल्या बदलांपुढ...
बाकी बदलांच गणित उमजलं नाही......

बाकी बदल व्हायलाच पाहिजे बरं
कारण तोच काळा पैसा जर का
तसाच राहिला टिकुन बा च्या खिशात
रातच्याला मग तो जातोच पहा गुत्त्यात....
म्हणुन म्हणतो बदल व्हायलाच हवा
फक्त नोटांच्याच नाही तर माणसांच्याही रंगात....
बाकी चलन बदल
किंवा आणखी काही
काहीही म्हणोत त्याला...
बदलेल्या नोटांपेक्षा
बदललेली माणसं पाहायचीत मला.....

शशिकांत मा. बाबर
📞९१30६२०८३४

Tuesday, October 18, 2016

सांगायच राहुन जातं.....

🌹सांगायच ते राहुन जातं....🌹

तो हल्ली नुसताच बघतो तिला
जरा नाही दिसली की याला  करमत नाही
कधी वाटतं सांगावं सारं सारं
जे जे आहे मनात साठलेलं
पण पुन्हा भिती वाटते काय वाटेल
तिलाही तोच अर्थ भेटेल
की तिसरच काही वाटेल
अशा अशातच सांगायच राहुन जातं
मनातल सारं मनातच खाऊन होतं .......॥

सुरुवातीला वाटलं होतं
कदाचित असेल हे आकर्षण
पण आता माञ तिचाच विचार
तिच आठवते क्षण क्षण
सुर लावतो गळा गाण्यास याचा
मन अंतरीचे अंतरच मिटत नाही
अन् याचं गाऊन होतं....
पुन्हा सांगायच ते राहुन जातं ........॥

कधी वाटतं चल सोड सारं
ह्यात काही खरं नाही
पण मन मध्येच सांगतं,
आता तिच्याशिवाय बरं नाही
काय करावं काहीच सुचत नाही
अगदी जवळ आल्यासारखे वाटते
सांगायचे सारेच गळ्यात दाटते
पण हे गोड स्वप्नही ,
अश्रुंसोबत अलगद अचानक वाहुन जातं..
सांगायच जे ते राहुन जातं....॥


✍शशि...( तुझाच विचार करताना....)
www.shashichyamanatale.blogspot.com

Tuesday, October 11, 2016

जोडतो मी..

*💥🌹जोडतो मी ......🌹💥*

*माणसांना माणसाशी जोडतो मी*
*दुभंगल्या मनांना मनाशी जोडतो मी ॥*

चुक झाली भुल झाली
तु काय ती मुद्दाम केली
विसरतो जे विसराया पाहिजे
नको जे ध्यानात नसायला पाहिजे
व्यथा माझ्या कथा तुझ्या
सारेच मागे सोडतो मी
*माणसांना माणसाशी.....*
*......................जोडतो मी ॥*

कोण इथे कधी बघ कसा वागतो
जो तो स्वार्थासाठीच पाठी लागतो
जिथे ना मिळणार काही, तिथे कोण काय मागतो
देणाराही आता कोण इथे, वचनाला जागतो
या अशा वागण्यास यांच्या
हल्ली रोजच खोडतो मी
*माणसांना माणसाशी .....*
*......................जोडतो मी ॥*

तु मला आवडते , तुच माझी राणी
वयातल्या पोराची हल्ली,हिच असते वाणी
जागोजागी मग येतात,ऐकु प्रेमाची गाणी
हे यांचे प्रेम की असते नुसतेच आकर्षण
यांनाच नाही कळतं, मग चुका घडतात क्षण-क्षण
पडणारे पाऊल असे दिसताच मजला
मार्ग तयांचे मोडतो मी
*माणसांना माणसांशी......*
*......................जोडतो मी ॥*

*✍शशि...( जोडारी- माणसांचा , माणसांच्या मनाचा )*
*www.shashichyamanatale.blogspot.com*

रावण दहन

१) रावण दहन

दरवर्षी रावण दहन
तुम्ही आम्ही पाहत आहोत ।
दरवर्षी गोडवे रामाचे
तुम्ही आम्ही गात आहोत ॥

कागदाचे रावण आम्ही 
दरवर्षी जाळत असतो ।
एक रावण मनात माञ
कायमच पाळत असतो ॥

धर्माची अधर्मावर जीत म्हणत
आपण नाचत असतो ।
घरातल्या सीतेला इथला राम
माञ रोजच जाचत असतो ॥

रावणाला शिव्या देत
आम्ही जगत असतो ।
पण खरच का रामासारखे
आपणही वागत असतो ..? 

जळणारा रावणही आपल्याला
हसत हसत पाहत आहे ।
त्याचा अंश त्याला
 आपल्यात दिसत आहे ॥

तेंव्हा, समजलच तर सारे
मनामनातला रावण जाळु या ।
मग आनंदाचे तोरण भारी
दारादारावर माळु या ॥

✍शशिकांत मा. बाबर
www.shashichyamanatale.blogspot.com

Monday, August 29, 2016

सोसल तेवढच सॊशल

पटलं तर घ्या 📖📖📖
----------------------------------------

*सोसल तेवढंच सोशल*

खरे तर आज प्रगतीचे युग आहे . या स्पर्धेच्या, तंञज्ञानाच्या ,विज्ञानाच्या आणखी कशाच्या म्हणता येईल त्या युगात आपण जगत आहोत . सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत नव्हे बनलाच आहे . वर्तमानपञ,इंटरनेट या बरोबरच व्हाँटस अप, फेसबुक अन् व्टिटरच्या माध्यमानं त्याची व्याप्ति वाढली आहे . अबोलकी माणसंही या निमित्ताने बोलकी झाली.माणसानं नव्याचं स्वागत जरुर करावं पण जुन्याचा आदर्शही विसरता कामा नये. आज आम्ही या सोशल मिडियाचा किती वापर करतो आहोत . यामुळे आपण वेळ असुन व्यस्त झालो आहोत. पुर्वीच्या घरी रामकृष्ण अन् विरशिवाजीच्या गोष्टी सांगत असे आजी पण आता मोबाईलनच मारलीय बाजी. बाळ असते गुंग त्याच्या मोबाइल मध्ये अन् आजी बिचारी निवांत. त्या मोबाईलमध्येच तो कसल्या कसल्या गोष्टी पाहतो, ऎकतो ,मग दुसर्या गोष्टी ऐकायला त्याला वेळच कसा मिळणार अन् तसेही यमी अन् मम्मी एवढंच कळणार्या त्याला त्या आजीच्या राजाराणीच्या अन् सोनपरीच्या गोष्टी कशा कळणार. आणि गोष्टीतल्या सोनपरी ऐकायला त्याला कसे चालणार ,त्याची परी त्याला रोजचं हायबाय करत असतेच की आॅनलाईन . पूर्वी आपल्या घरची सुरवात जात्यावरच्या ओव्यांनी व्हायची आता हिच सुरवात एकाकीपणाच्या जाणिवेने अन् बारकाव्यांनी होते.पूर्वी घरची सकाळ आस्था टिव्हीने व्हायची आता हिच सकाळ एम टिव्हीने सुरु व्हायला लागली अन् साहजिकच राञ ' *तुका झालासे कळस* 'ने नाहितर ' *तुक्या तुकविला नाग्या नाचविला* 'ने होते. मी हे सर्व का सांगतोय ? सोशल मिडियाचा वापर तोही (गैर) वापर होतं असल्याने हे चिञ आहे . आज मोबाइल ही चैनीची वस्तु न राहता गरज बनली आहे. एवढच नाहितर या गोष्टींचं व्यसनं बनत चाललय. तंञज्ञानाने जगाला जवळ आणले हे जरी खरे असले तरी या सोशल मिडियाच्या अतिवापराने दुर दुर गेलीत माणसे. एकाच घरात राहणार्यांही परस्परात बोलायला वेळ नाहियं. सारं काहि अगदी तळहातावर हवं, अशी आपली मानसिकता झालीय. सार्याच गोष्टी जरा गुगल करुन बघु, म्हणत पाहिजे असतात आपल्याला . *परस्परांची नाती जपण्यापेक्षा या सोशल मिडियाच्या तेलानं ती वातीसारखी जळु लागलीत*. शेवटी एवढंच *या सोशल मिडियाचा सोसल तेवढाच वापर व्हावा*  कारण *आईचे प्रेम अन् पावसाचा थेंब अजुन तरी नेटवर मिळत नाहीच*.

✍शशिकांत मा. बाबर
( शिवव्याख्याते,बोररांजणी, जि. जालना )

विविध विषयावरील बहुरंगी लेख,कविता वाचण्यासाठी संपर्क 👇👇👇
मो.९१३०६२०८३४(what'sapp)
shashikantbabar12@gmail.com

Sunday, August 28, 2016

राञ

💥  राञ....💥

उद्याची स्वप्न याच राञीत
असतात पहुडलेली
सारी शांत होतात मेंदु
काही काळ का होईना
विसरली जातात विचार नडलेली ॥

हिच ती राञ असते
जिच्या उदरात साठवलेला आहे गर्द काळोख
याच राञीच्या स्वप्नात होते   काहिंची ओळख
कधी कधी वाटते मी कुठे असा विचार केला
मग का तरी हा भयान पसारा सामोरी आला ॥

खरच हि राञ विलक्षण असते
कुठे सारे शांत निवांत असते
कुठे निद्रेचीही भ्रांत नसते
कुठे असतो मिणमिणता उजेड पणतीचा
कुठे लख्ख दिव्यांचा प्रकाश सोबतीला
कुठे उजेड निद्रित देहास साथीला
कुठे घासाडते शिव्या माय विझणार्या वातीला ॥

हि राञ साक्षीला कित्येक मिलनांच्या
त्याच्या झिंगल्या नशेतही विलनांच्या
अंधाराचे अधिराज्य गाजवणारी
रातकिड्यांची गुणगुण कानी वाजवणारी
हि सारी रामकहानी राञीची आहे
नको समजु भंकस याला
गोष्ट राञीची सारी खाञीची आहे ॥

✍शशिकांत मा. बाबर
📱९१३०६२०८३४
२५/०८/२०१६ ( १:१५ am)

नवाच प्रश्न

नवाच प्रश्न ......

पाहताच तुजला आज सये
मी ऊगाच बावरलो होतो ।
मग हळुच येता भान जराशे
मी माझाच सावरलो होतो ॥

पाहताच तुझा तो चेहरा
हसलो ऊगाच गाली ।
तुझ ओठांतुन शब्दन् फुटले
पण बोलली बरेच लाली ॥

तुझ नयनांनी मज नयनांशी
हळुच सारे सांगावे ।
मुक्या आपुल्या गीतांचे
मग किस्से हळुच पांगावे ॥

वाटेल तुझला विचिञ सारे
अन् भासेन मी ग वेडा ।
पण मी आपुला साधा भोळा नंदी
तुझ भासलो जरी ग रेडा ॥

मज अंतरी जे दाटले
ते यात सारे मी मांडले ।
बघ आज अचानक कसे
भाव अंतरीचे इथे सांडले ॥

सये माझ्या प्रेमाची ग
जरा न्यारीच आहे रीत ।
लोकांची प्यारी शायरी
पण माझे साधे गीत ॥

आत्ताच नको तु विचार करु
मी कोण कुठला कळेलच तुला ।
तु उत्तर माझ्या प्रश्नांचे जरी
आज नवाच प्रश्न पडलाय मला ॥

✍शशिकांत मा. बाबर
📱९१३०६२०८३४
www.shashichyamanatale.blogspot.com

तुझा गाव

तुझा गाव तसा राहिला नाही

                 कवि:- शशिकांत मा. बाबर
                  संपर्क:-९१३०६२०८३४

जिकडे तिकडे नुसतीच गर्दी बाहुल्यांची
दिसते मजला नुसतीच गर्दी साउल्यांची
गावाचा शिवार ही तसा राहिला नाही
झुडपात तिथेही कुठे आता
ससा राहिला नाही
तुझा गाव तसा राहिला नाही

असायचा सगळीकडेच नुसताच बोलबाला
असो पोळा अथवा गोपाळकाला
सगळेच कसे जमायचे
अगदी घरच्या सारखे
आता झाली पाखरे घरट्यास पारखे
देती सढळ हाताने तो पसा राहिला नाही
खरच तुझा गाव तसा राहिला नाही

होता कसा कट्टा, चालायची आपुली थट्टा
आता कुठे दिसते तसे
बदलले इतक्यात कसे
साधीच राहायची पोरं,आता करती बघ नट्टापट्टा
ऎकु येत नाही आता कुठे गोसायाची गाणी
विसरला गायाचे की तो घसाच राहिला नाही
पण खरच तुझा गाव तसा राहिला नाही

तु म्हणशील नेमका कसा राहिला नाही
मंदिरात दिव्यांचा आरास राहिला नाही की
पहाटेचा प्राजक्ताचा गंधाळ वास राहिला नाही
आपुलकी अन् मायेचा तो साथ राहिला नाही की
ध्यानात तुझ्या तो घात राहिला नाही
ते काहिहि असो, पण आपुलाच आपल्या हातात हात राहिला
मग जर तुच तसा राहिला नाही
तर गावही तसा राहिला तरी कसा ॥

www.shashichyamanatale.blogspot.com

माफी मागु नकोस

🙏माफी मागु नकोस 🙏

            कवि :- शशिकांत मा. बाबर
            संपर्क :- ९१३०६२०८३४

सारा गाव झोपल्यावर तु माझ्याकडे ये
अलगद येवून मला तुझ्या मिठीत घे
एकदा का आलीस मिठीत
पुन्हा हात मोकळे करु नकोस ॥

हा बेभान वारा झोंबेलच तुला
पण म्हणुन घाबरायच कारण नाही
हे वारेही श्वासाहुन वेगळे धरु नकोस ॥

बर्याच दिसांचे तुला बोलायचे बरेच काही
सांगायचे तुला सारे खरेच काही
हरवेळी मी असचं ठरवतो काही बाही
पण कधी तु येत नाही, कधी शब्द ओठी येत नाही ॥

आज जर आलीच तु
तर लगेच कारणं विचारु नकोस
अन् मी नाहीच काही बोललो
तर लगेच परतीची वाट धरु नकोस ॥

अन् जर नाहीच जमलं तुला येणं
तर झोपेचं कारण सांगु नकोस
पुन्हा येईल म्हणत माफीही मागु नकोस ॥
www.shashichyamanatale.blogspot.com

Monday, August 15, 2016

अक्षरमोती ओंजळीतले: पुल

अक्षरमोती ओंजळीतले: पुल: Links

वेदना

📌😌 वेदना ... 😊📌

जे वेदांनाही जमले नाही
ते वेदना सांगुन जाते ।
गुंज अंतरीचे कानी
मग हळुच गाऊन जाते ॥

करते घायाळ अशी की
जणु वाघिण चावुन जाते ।
ही वेदनाच असते खरी
कोण खरे दावुन जाते ॥

करते मज अस्वस्थ हल्ली
उगाच घडीभर राहुन जाते ।
तिच्या जराश्या सहवासानेही
हास्य गालीचे वाहुन जाते ॥

अशी कशी ही चेटकीण
क्षणात सुख खाऊन जाते ।
आठवण माझी येता लगेच
परतण्या मजपाशी धावुन येते ॥

नकोच असते कोणालाही
उगा सोबती वेदना ।
पण सावलीसम सोबतीला
राहतेच ही वेदना ॥

कधी ओठांमधुन हळुच बाहेर
निघते थरथरत वेदना
कधी नयनी पापण्यांमध्ये
बसते दडुन वेदना ॥

✍शशिकांत मा. बाबर
📱९१३०६२०७३४

सलाम

२६ जुलै
कारगिल विजय दिवस पर सबको शुभकामनायें और शहीदों को विनम्र श्रद्धांजली
💐💐💐💐💐💐

📌 👏सलाम ..👏📌

तिरंगेको सलाम मेरा
हर पल  तिरंगेको सलाम
नशा है बढा राष्ट्रभक्तीका
ईसके बढकर ना कोई जाम


हिमालय की चोटीको सलाम
सियाचिन की घाटी को सलाम
यहाँ के मिट्टी मे है भगवान
यहाँ जगह जगह पे है धाम ॥

पावन भुमी यहाँ की
बहती पावन गंगा
कही प्रेमभाव की बौछार
कही होता है दंगा
भिरभी प्यारा हमसबको
जानसे अपना तिरंगा ॥

कारगिल की मिट्टी अबतक
भुली नही हो नरसंहार ॥
भारत माँ के लालोंने कैसी
दे दी दुश्मन को हार ॥

अब क्या औखात कीसकी
कोई ले ले हमसे पंगा ।
चाहें जो करना है कर लो
शान से लहराहेगा तिरंगा ॥

कर ले आज तिरंगे को सलाम
देश के किसान को सलाम ।
सीमाओं पे लढने वाले
जाँबाज जवानों को सलाम ॥

✍शशिकांत मा. बाबर
📱९१३०६२०८३४

मोहिनी

📌 🍵 मोहिनी 🍵📌

चाँदनी की चाह में
मैने कहाँ दोस्तसे ,
मै भी तो चाँद की तरह हूँ
माना की दाग है चेहरे पे
लेकिन दिलसे साफ हूँ
वक्त वक्त पे अपना काम करता हूँ
जैसे रात मे सूरज का काम करता हूँ ॥

वो बडे प्यारसे बोला,
माना तु चाँद है
दिल तेरा साफ है
लेकिन जेब तेरी खाली है
तु बिन बगीचे का माली है
और सुन मेरी बात
तेरे पास है सारा ज्ञान
लेकिन तु नही है सलमान
इसलिये तबीयत और जेबपे
दोस्त मेरे दे तु ध्यान ॥

यह २१वी सदी है भाई
यहा चाँदनी चाँद के पीछे नही
चंदे के पीछे होती है ॥

यूँ तो मैं रहता हूँ खामोश
लेकिन आज आया था जोश
सुनके लेकिन बाते यह
उड गये आज मेरे होश ॥

अब ना कोई चाँदनी
ना ही कोई रागिनी
सुबह शाम अब बस
खुलके पिओ चाय मोहिनी ॥

✍शशिकांत मा. बाबर
(बोररांजणी, जि.जालना)
📱९१३०६२०८३४

® Share If U agree....
😋😋😋😋😋😋😋

बदल

📌📌  बदल....📌📌

गजबजलेली गर्दी चहुकडे
पण आवाज येत नाही ।
आवाज इथे बंद झाले
की काने बधिर झाली ॥

वाढलाय नुसताच गोतावला
पाहिजे क्षणात सारे आता ।
यंञवत झाले जगणे की
 माणसे अधिर झाली ॥

कळेना काहीच हल्ली
सुरक्षित ना इथे गल्ली ॥
जनावरे तरी शहाणी झाली
पण माणसेच जनावरे झाली ॥

सारेच इथे गड्या आता
अगदी अजब गजब आहे ।
मंदिरे ओसाड इथे अन्
भरगच्च भरलेले पब आहे ॥

देवा तुच सांग आता
इतके कसे बदलले जग ।
साचेच बदलले तु की
आपोआप बदलले हे नग ॥

✍शशिकांत मा. बाबर
( बोररांजणी, जि. जालना )
📱९१३०६२०८३४

पुल

महाडच्या दुर्दैवी घटनेत मरण पावलेल्या सर्वांना भावपुर्ण श्रद्धांजलि💐💐

सदर रचना त्यांच्या पावन स्मृतीस अर्पण करतो....

💥   पूल   💥

इथे कधी, तिथे कधी
कोसळतो पहा पूल ।
माणसासारखाच आता
निसर्गही देतोय पहा हूल ॥

कुठे काही घडले की
मगच येते आम्हा जाग ।
जो तो भरलेला पण
शोधती दुसर्यावरचे दाग ॥

गेल्या नाहि बस नुसत्या
सारे प्रवासी वाहुन गेले ।
साविञीच्या पाण्याने त्यांचे
संसारही मोडुन नेले ॥

आता चालु शोधमोहिम
एकामागुन एक सापडतील सारे ।
एकदा का झाले सगळे
पुन्हा पहिल्यासारखे वाहतील वारे ॥

असे काही घडल्यावरच
चालु होते सारी चर्चा ।
वाद-विवाद अन् चौकशी
विरोधकांचा पुन्हा मोर्चा ॥

घडण्याआधी विपरीत
यांना काहि कळत नाही ।
कॅमेरा अन् पञकाराशिवाय
अश्रु यांचे गळत नाही ॥

ना कसली पाहणी कशाची
नव्हता कुणालाच घोर ।
जिथे तिथे जागोजागी
दडलेला प्रत्येकातच चोर ॥

चोरांची या पोटापेक्षा खिशाचीच
जास्त आहे भुक
'शशि' माञ नेहमीच सांगेल
हे सारे आहे चुक ॥

वाहण्याआधी दुसरा इथे
आता तरी कळायला हवे ।
करुन पाहणी गांभीर्याने
बांधायला हवे पूल नवे ॥

✍शशिकांत मा. बाबर
संपर्क :- ९१३०६२०८३४
दि. ०५/०८/२०१६
©copyright.

सोसल तेवढच सोशल

पटलं तर घ्या 📖📖📖
----------------------------------------

सोसल तेवढंच सोशल

खरे तर आज प्रगतीचे युग आहे . या स्पर्धेच्या, तंञज्ञानाच्या ,विज्ञानाच्या आणखी कशाच्या म्हणता येईल त्या युगात आपण जगत आहोत . सोशल मीडिया हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनत नव्हे बनलाच आहे . वर्तमानपञ,इंटरनेट या बरोबरच व्हाँटस अप, फेसबुक अन् व्टिटरच्या माध्यमानं त्याची व्याप्ति वाढली आहे . अबोलकी माणसंही या निमित्ताने बोलकी झाली.माणसानं नव्याचं स्वागत जरुर करावं पण जुन्याचा आदर्शही विसरता कामा नये. आज आम्ही या सोशल मिडियाचा किती वापर करतो आहोत . यामुळे आपण वेळ असुन व्यस्त झालो आहोत. पुर्वीच्या घरी रामकृष्ण अन् विरशिवाजीच्या गोष्टी सांगत असे आजी पण आता मोबाईलनच मारलीय बाजी. बाळ असते गुंग त्याच्या मोबाइल मध्ये अन् आजी बिचारी निवांत. त्या मोबाईलमध्येच तो कसल्या कसल्या गोष्टी पाहतो, ऎकतो ,मग दुसर्या गोष्टी ऐकायला त्याला वेळच कसा मिळणार अन् तसेही यमी अन् मम्मी एवढंच कळणार्या त्याला त्या आजीच्या राजाराणीच्या अन् सोनपरीच्या गोष्टी कशा कळणार. आणि गोष्टीतल्या सोनपरी ऐकायला त्याला कसे चालणार ,त्याची परी त्याला रोजचं हायबाय करत असतेच की आॅनलाईन . पूर्वी आपल्या घरची सुरवात जात्यावरच्या ओव्यांनी व्हायची आता हिच सुरवात एकाकीपणाच्या जाणिवेने अन् बारकाव्यांनी होते.पूर्वी घरची सकाळ आस्था टिव्हीने व्हायची आता हिच सकाळ एम टिव्हीने सुरु व्हायला लागली अन् साहजिकच राञ ' तुका झालासे कळस 'ने नाहितर ' तुक्या तुकविला नाग्या नाचविला 'ने होते. मी हे सर्व का सांगतोय ? सोशल मिडियाचा वापर तोही (गैर) वापर होतं असल्याने हे चिञ आहे . आज मोबाइल ही चैनीची वस्तु न राहता गरज बनली आहे. एवढच नाहितर या गोष्टींचं व्यसनं बनत चाललय. तंञज्ञानाने जगाला जवळ आणले हे जरी खरे असले तरी या सोशल मिडियाच्या अतिवापराने दुर दुर गेलीत माणसे. एकाच घरात राहणार्यांही परस्परात बोलायला वेळ नाहियं. सारं काहि अगदी तळहातावर हवं, अशी आपली मानसिकता झालीय. सार्याच गोष्टी जरा गुगल करुन बघु, म्हणत पाहिजे असतात आपल्याला . परस्परांची नाती जपण्यापेक्षा या सोशल मिडियाच्या तेलानं ती वातीसारखी जळु लागलीत. शेवटी एवढंच., या सोशल मिडियाचा सोसल तेवढाच वापर व्हावा कारण आईचे प्रेम अन् पावसाचा थेंब अजुन तरी नेटवर मिळत नाहीच.

✍शशिकांत मा. बाबर
( शिवव्याख्याते,बोररांजणी, जि. जालना ) 

धोका

📌📌  *धोका*  📌📌

देती आताशा मजला
माझीच माणसे धोका ।
दिला हाती दोर ज्यांच्या
त्यांनीच रोखला झोका ॥

ज्यांना आपुले समजले
त्यांनीच तिला धोका ।
विश्वास पाण्यावरी जरी
बुडते अचानक नौका ॥

हे सारेच असेच का
कुणीतरी हे सारे रोका ।
हरघडी हाय यांना
मी देतोच कसा मौका ॥

दोष त्यांचा कसा म्हणावा
ते त्यांचे खेळ खेळले ।
माझ्या साध्या चेंडुवर
त्यांनी लावला वेळीच चौका ॥

आता सारे कळुन चुकले
मीही जरा शहाणा झालो ।
त्यांच्याशी खेळाया मीही
त्यांच्याच रंगात न्हाऊन आलो ॥

*_✍शशिकांत मा. बाबर_*
संपर्क:- _९१३०६२०८३४_

खरच माझ्यावर प्रेम करतेस....?

📌 😊खरच सांग माझ्यावर प्रेम
करतेस.....? 😊📌

हल्ली तु मला पाहतेस
उगाच लाजतेस,गालात हासतेस
अन् तशीच निघुन जातेस
पण घरी गेल्यावर माझी कविता
न चुकता वाचतेस
खरच सांग माझ्यावर प्रेम करतेस ॥

हल्ली तु जास्तच सजतेस
घडी घडी आरशात पाहतेस
काही नसलं तरी उगाच
मागे वळुन पाहतेस
खरच सांग माझ्यावर प्रेम करतेस ॥

हल्ली तु बोलत नाहीस
थेट सरळ पाहत नाहीस
मग मी पाहिलं का म्हणुन
का मैञिणीला विचारतेस?
खरच सांग माझ्यावर प्रेम करतेस ? ॥

मन सांगते बोल आता
सांग काही जाता जाता
पण तु लगेच मौन धरतेस
अन् घरी गेल्यावर माझी कविता
मनातल्या मनात गुणगुणतेस
खरच सांग माझ्यावर प्रेम करतेस?

मी विचारलेला प्रश्न
आता नसेल सुटत तर सोडु  नकोस
नसेल ठरत तर बोलु नकोस
पण प्रश्न जिवंत ठेव काळजात
त्याला माञ मरु देऊ नकोस ॥

तसं तु करणार नाहीस
कारण तुही माझ्यासाठी झुरतेस
मग सांगायला का लाजतेस
सांगुन टाक एकदाचं
तु खरच प्रेम करतेस ॥

✍शशिकांत मा. बाबर
📱 ९१३०६२०८३४

तिरंगा

*Independence day special -----------*

💥🇮🇳 तिरंगा 🇮🇳💥

बोल रहा है तिरंगा
मन की बाते सारी, आज खोल रहा है तिरंगा

वो दिनभी क्या दिन थे
मेरे खातिर मरने को, हरकोई था तैयार
भारत माँ के बच्चे बच्चेने, सीने पे ले लिये वार
आझादी का सपना था
बच्चा बच्चा अपना था
मर मिटने का ,नही था कोई डर
याद न आती घरवाली , ना याद आता घर
उडने लगेथे हवाओं मे, फैलाये अपने पर
ऐसी और भी बातें है
सारी यादें खोल रहा है तिरंगा
बोल रहा है तिरंगा ॥१॥

आझादी को बरसों हो गये
फिर भी बेहाल है हिंदुस्तान
आझादी की कीमत को
शायद भुला है हिंदुस्तान
इसीलिए माँ,बहन, बेटी की
इज्जत का रहा नही सम्मान
कही घोटाला,कही बलात्कार
शहिदों के कफन को, बस यही मिला सत्कार
कारगिल की बातोंको, अबतक भुला ना पाया हुँ
न जाने कितने शहिदोंके ,सीनेपे मै सोया हुँ
काश्मीर की माटी से,सियाचिन की घाटी से
बोल रहा है तिरंगा ॥२॥

कहि मंहगाई,कही दहशत है छाई
कभी घाटी ,कभी पर्वत पर
मिट्टी बार बार है रोई
बंद करो अब तो आतंग,बस हो गयी ये जंग
बार बार कहता है तिरंगा
कितनें आयें कितने गये
हिमालय की चोटीपे लहराता है तिरंगा
भले मै छुँ लू गगन, फिरभी दुःखी है मेरा मन
लगा लगाके मलई , गोरी करली चमडी
लेकीन कालें हो गयें मन
कह सारी बातें ये, रो रहा है तिरंगा
सीसक सीसक के बोल रहा है तिरंगा ॥३॥

✍शशिकांत मा. बाबर
( बोररांजणी,जि. जालना )
📱९१३०६२०८३४

Sunday, August 14, 2016

स्वप्न

💥💥  *स्वप्न...*💥💥

एक होतं गाव
तिथे होतं एक ठुमदार घर
समोर छान बगीचा, एक मोठी कार
पाहायची स्वप्ने सारीच चंद्राची
गोष्टी इथल्या रती अन् इंद्राची ॥

तसच दुसरही होतं एक गाव
जरा दुर तटावर जाया तिथे नाव
तिथे माञ मिञा नव्हतं ठुमदार घर
कुठे होती झोपडी,कुठे भिंती लिंपती कर
यांना नव्हती कसली स्वप्न पडायची साखरेची
प्रश्न रोजच पडायचा,
काय खायचं अन् चिंता भाकरेची ॥

ही दोन गावं तशी पाहिली तर जवळ
पाहिली तर किसो दूर
एकीकडे पैशांचा धुर तर
 दुसरीकडे आसवांचा पुर
ही नव्हे कोण्या दंतकथेतली गावं
शोधल्यावर कळेल,ओळखीच वाटतील नावं
म्हणायला यांचा एकच आहे देश
दोघांच्याही हिशोबातला वेगळा आहे शेष
एक चकाकत्या इंडियातली स्मार्ट सिटी
दुसरीकडे कुपोषित भारताच्या नावाची पाटी ॥

आपण आपलं करायच असतं
आपण आपलं बघायच असतं
शेजारच्याशी आपलं देणंघेणं नसतं
हेच होतायत आमच्यावर संस्कार
म्हणुनच भेगाळल्यागत झाल्यात इथल्या वस्त्या
अन् दुभंगलीत इथली गावं ॥

सारा बिघडत चाललाय आकार अन् ऊकार
मग तुम्हीच सांगा कलाम सर
कसे अन् कधी होणार
स्वप्न तुमचे आमचे साकार ॥

*कवि:- शशिकांत मा. बाबर*
( बोररांजणीकर,जि. जालना)
संपर्क :-९१४०६२०८३४